पिंपरी-चिंचवड

तांत्रिक बिघाडाने देहूचा पाणीपुरवठा ठप्प

CD

देहू, ता. २० : देहू नगरपंचायत हद्दीत बोडकेवाडी येथील जलउपसा केंद्रात विद्युत मोटारीत तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे नगर पंचायत हद्दीत शनिवारपासून (ता.१९) पाणीपुरवठा ठप्प आहे. दरम्यान, आषाढी वारी प्रवास करून संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सोमवारी (ता.२१) देहूत येत आहे. त्यामुळे भाविकांसाठी पाणी उपलब्ध करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.
देहू नगर पंचायत हद्दीत बोडकेवाडी येथील केंद्राद्वारे उपसा करून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, मागील दोन दिवसांपासून येथील यंत्रणा नादुरुस्त आहे. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा झालेला नाही.
याबाबत मुख्याधिकारी चेतन कोंडे म्हणाले, ‘‘शनिवारी विद्युत मोटारीत बिघाड झाला. दुसरी विद्युत मोटर तासभर सुरू झाली. मात्र, त्यामध्येही बिघाड झाला. रविवारी दिवसभर दुरुस्ती सुरू होती. सोमवारी सकाळपर्यंत मोटार बसविण्यात येईल. तसेच पालखी सोहळा देहूत येत आहे. भाविकांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी दहा टँकर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मारहाण भोवली! अजित पवारांचे राजीनाम्याचे आदेश, कोण आहे सुरज चव्हाण?

Latest Maharashtra News Updates : तुळजाभवानी मंदिरात सुरक्षारक्षक आणि कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ

Omar Abdullah: काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा द्या; उमर यांची पुन्हा मागणी, कायदेशीर पर्यायांवर विचार करणार

वर ढगाला लागली कळं, AC लोकलच्या डब्यातून पाणी थेंब थेंब गळं; प्रवाशांमधून संतापाची लाट, CM फडणवीसांनाही VIDEO केला टॅग

Wagholi Traffic Issues : पूर्व प्रवेशद्वारावर कचरा अन्‌ पाणी; वाघोलीत भेडसावतेय वाहतूक कोंडीची समस्या

SCROLL FOR NEXT