पिंपरी-चिंचवड

वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी कडक पोलिस बंदोबस्त

CD

देहू, ता. ३ : संत तुकाराम महाराज बीज सोहळा गुरुवारी (ता. ५) साजरा होत असून, या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांच्या सुरक्षिततेसाठी देहूरोड पोलिस प्रशासनाने व्यापक तयारी केली आहे. संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त देऊळवाडा ते वैकुंठस्थान परिसरात चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. बंदोबस्तासाठी २२० पोलिस कर्मचारी कार्यरत राहणार असल्याची माहिती देहूरोड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिली.
बीज सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम इंद्रायणी नदीकाठी असलेल्या वैकुंठस्थान येथे होत असतो. पहाटेपासूनच भाविक आणि वारकरी दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. दर्शनासाठी रांगा लागतात. या ठिकाणी चेंगराचेंगरी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी देऊळवाड्यातून येणाऱ्या पालखीसाठी स्वतंत्र मार्ग तयार केला आहे. सकाळी साडेदहा वाजता देऊळवाड्यातून संत तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान केल्यानंतर तिच्यासोबत कडक पोलिस बंदोबस्त असणार आहे. वैकुंठस्थान येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. परिसरातील रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. इंद्रायणी नदीला पाणी सोडण्यात आल्याने नदीत बुडण्याच्या घटना टाळण्यासाठी जीवरक्षक तैनात करण्यात येणार आहेत. देऊळवाडा परिसरातही कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

बीज सोहळ्याच्या दोन दिवस आधीपासूनच देहूत पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिस यंत्रणा तत्पर राहणार आहे.
- विक्रम बनसोडे, पोलिस निरीक्षक

असा आहे पोलिस बंदोबस्त
- सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) ः ४
- पोलिस निरीक्षक ः १२
- सहायक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक ः ४४
- पोलिस कर्मचारी ः २२०
- होमगार्ड ः ८०
- राज्य राखीव पोलिस दल तुकड्या ः २
- बॉम्बशोधक व नाशक पथक ः १
- श्वानपथक ः १
- जीवरक्षक पथक ः १
- एनडीआरएफ टीम ः १

महत्वाचे....
- देऊळवाडा परिसरात विशेष लक्ष ठेवण्यात येणार
- बीज सोहळ्याच्या दिवशी देहूमध्ये अवजड वाहनांना प्रवेशबंदी
- देहू ते आळंदी मार्गावरील वाहनांसाठी विठ्ठलवाडी येथे वाहनतळाची व्यवस्था
- देहू ते देहूरोड या पालखी मार्गावरील वाहनांसाठी माळवाडी येथील लष्कराच्या जागेत वाहनतळ निश्चित करणार
- पालखी मार्गावरील वाहतुकीस अडथळा ठरणारे बॅनर काढणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iran-israel conflict: होर्मुझमध्ये ७०० तेल टँकर अडकले! जगात तेल संकटाची भीती; भारताकडे किती दिवसांचा साठा?

Team India Schedule: ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर भारतीय संघाचे वेळापत्रक; अफगाणिस्ताननंतर कोणकोणत्या संघाला भिडणार, घ्या जाणून

Mahur News : माहूरमध्ये वाळू माफियांची मुजोरी! पोलिसांना जीवे मारण्याची धमकी देत अंगावर धावून गेले; टिपर मालकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : पुण्याच्या आनंदनगर उड्डाण पुलावर अपघात

Rashmika & Vijay : रश्मिका–विजयचा विवाहसोहळ्यानंतर गावात पूजाअर्चा, देशभर अन्नदान

SCROLL FOR NEXT