पिंपरी-चिंचवड

प्रशांत भागवत यांना आदर्श युवा उद्योजक पुरस्कार

CD

इंदोरी, ता. ७ ः येथील माजी उपसरपंच व मावळ रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष व गुणवंत कामगार प्रशांत भागवत यांना श्री संत संताजी महाराज जगनाडे जयंती उत्सव समिती चाकण यांच्या वतीने आदर्श युवा उद्योजक पुरस्काराने गौरविण्यात आले.
संताजी महाराज यांच्या चारशेव्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रशांत भागवत यांचे कामगार, शैक्षणिक, उद्योग, व्यापार, राजकीय व सामाजिक क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पगडी, शाल, मानपत्र, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
तैलीक महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत वाव्हळ, माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, संताजी महाराज संस्थानचे
अध्यक्ष शिवदास उबाळे, कार्याध्यक्ष विजय रत्नपारखी व संताजी महाराजांचे वंशज अजय जगनाडे यांच्या हस्ते पुरस्कार
प्रदान करण्यात आला. या वेळी प्रदूषण महामंडळ सदस्य नितीन गोरे, माजी नगरसेवक अविनाश बागवे, राजेश राऊत, सौरभ भागवत उपस्थित होते. सत्कारास उत्तर देताना प्रशांत भागवत म्हणाले, ‘‘पुरस्काराने जबाबदारी वाढली असून, यापुढे ही सामाजिक कार्यात अधिक सक्रिय राहीन व ज्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे कार्यरत आहे. अशा माझ्या कुटुंबीयांना व सहकारी मित्रांना हा पुरस्कार समर्पित करीत आहे.’’
प्रास्ताविक उत्सव समिती अध्यक्ष सुभाष शिंदे यांनी केले. आभार क्रांती सोमवंशी यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डिझेलचा भडका, एसटीच्या तिकीट दराचे काय? परिवहन मंत्री म्हणाले, महामंडळाला तोटा होतोय, सध्या...

Ambenali Accident: आंबेनळी ठरतोय मृत्यूचा घाट, ८ वर्षांपूर्वी झालेला ३३ जणांचा मृत्यू; गेल्या तीन महिन्यात तिसरी दुर्घटना

Supreme Court Dowry Harassment Ruling : सासरच्यांनी सुनेला जुळवून घेण्यास सांगितल्यास गुन्हा दाखल होणार? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश

Latest Marathi News Live Update : अर्जुन खोतकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट

Blackmail case: महिलेसोबतच्या व्हिडीओवरून ब्लॅकमेल, बँक कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल; ६ जणांवर गुन्हा, चौघांना अटक

SCROLL FOR NEXT