पिंपरी-चिंचवड

सांगुर्डे-देहू मार्गावर तरसाचा वावर

CD

इंदोरी, ता. ९ : सांगुर्डी परिसरात मागील दोन महिन्यांपासून तरस या प्राण्याचा वावर आढळून आला आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
सांगुर्डी गावाजळील देवीआईचा ओढा व झुरीच्या ओढ्याकाठी दाट झाडे, झुडपे, जाळ्या आहेत. त्यामुळे या परिसरात तरसाचे वास्तव्य असते. सायंकाळनंतर तो अनेकांना सांगुर्डी-देहू मार्गावर दिसला आहे. त्यामुळे देहूसह चिंचवड तसेच इंदोरी, तळेगावकडे जाणाऱ्या आणि तिकडून येणाऱ्या नागरिकांना भीती वाटत आहे.
हा तरस रात्री-अपरात्री अगदी गावातही येतो. टाकाऊ अन्नपदार्थ खाताना नागरिकांनी या तरसाला पाहिले आहे, असे ग्रामस्थ मल्हारी भसे, शांताराम काळे व गणेश भसे यांनी सांगितले. दरम्यान, तरसाचा वावर असल्याबाबत खेड वनविभागास कळविले आहे, अशी माहिती वसंत भसे, उपसरपंच योगिता भसे यांनी दिली.

सांगुर्डी : देहू रस्त्यावर दिसलेला तरस.

PNE25V30013

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पावसाळी वाहिनीच्या संथ कामामुळे वाहतूक ठप्प? उपाययोजना करण्याची नागरिकांतून मागणी

Buldhana News: पशुवैद्यकाने भर रस्त्यात स्वतःला पेटविले; उपचारादरम्यान मृत्यू ,निमगाव फाट्यावरील घटना

अमृता प्रेग्नेंट ? ऐश्वर्याचं कारस्थान उघड होणार ! "आता मजा येणार" प्रोमो पाहून प्रेक्षक खुश

Latest Maharashtra News Updates : अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान

Video : रेल्वे रुळावर हत्तीणीनं दिला बाळाला जन्म, अचानक समोरून ट्रेन आली अन् पुढे जे घडलं...; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT