इंदोरी, ता. १४ : येथील प्रगती विद्यालय व आ. ना. काशीद पाटील उच्च माध्यमिक विद्यालय येथे आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी सुरक्षिततेविषयी मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
विधी सेवा समिती (वडगाव मावळ) यांच्या वतीने वडगाव मावळ बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. राजेंद्र गाडे पाटील तसेच प्रशालेचे माजी विद्यार्थी ॲड. मल्हारराव शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यार्थ्यांना पोस्को कायदा, गुड टच व बॅड टच याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे व आवश्यक शैक्षणिक कायदे समजावून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मनातील विविध शंकांचे निरसनही करण्यात आले. प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य महादेव ढाकणे यांनी केले. सूत्रसंचालन रूपेश शिंदे यांनी केले. नियोजन पर्यवेक्षक काकासाहेब भोरे, स्मिता गजभीव आणि दीपक डांगले यांनी केले. आभार लक्ष्मण मखर यांनी मानले.
---------+--------------------
इंदोरी ः येथील प्रगती विद्यालयात मार्गदर्शन करताना ॲड. राजेंद्र गाडे पाटील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.