इंदोरी, ता. ४ : आदर्श ग्राम कान्हेवाडी तर्फे चाकण ग्रामपंचायतीने यंदा आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी (१ एप्रिल) १०० टक्के करवसुली करून सलग १८ वर्षांची परंपरा कायम राखली आहे. ग्रामपंचायतीकडून दरवर्षी मार्चमध्ये नागरिकांना कर भरण्याचे आवाहन करण्यात येते. त्यास नागरिक उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन सहकार्य करतात. या उपक्रमात गावातील बचत गट, युवकवर्ग, ग्रामस्थ तसेच सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्यासह ग्रामपंचायत अधिकारी सुप्रिया सांडभोर, लिपिक भाग्यश्री येवले आणि कर्मचारी महादू येवले यांचे मोलाचे योगदान लाभले. २०२६-२७ या आर्थिक वर्षात घरपट्टी, वीज व आरोग्य कर मिळून सात लाख ४३ हजार ९४४ रुपये, तर पाणीपट्टी दोन लाख ३५ हजार ४०० रुपये अशी एकूण नऊ लाख ७९ हजार ३४४ रुपयांची करवसुली करण्यात आली. ग्रामपंचायतीचे नियोजन आणि ग्रामस्थांचे सहकार्य यामुळे कान्हेवाडी ग्रामपंचायतीने विकासाचा आदर्श पॅटर्न उभा केला आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.