जाधववाडी, ता.१२ ः गेल्या काही दिवसांपासून स्वराज कॅपिटल आणि स्वराज रेसिडेन्सीजवळील बोराटे चौक येथील रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या गटारीमधून सतत पाणी वाहत आहे. या पाण्याचा प्रवाह इतका वाढला आहे की संपूर्ण रस्ता निसरडा झाला असून अनेक दुचाकीस्वार घसरून गंभीर जखमी झाले आहेत.
बोराटे चौक परिसर दिवसभर गजबजलेला असतो. शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांची गर्दी असते. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे दररोज एखादा तरी दुचाकीस्वार अपघातग्रस्त होत आहे. अंगणवाडी आणि लहान मुलांच्या शाळा असल्याने महिला त्यांच्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी जात असतात. नेमक्या चौकातच हा चिखल पसरल्याने वळण घेताना दुचाकी घसरून पडतात. गटारीचे झाकण फुटल्यामुळे येथे मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे पादचारी सुद्धा खड्ड्यात पाय जाऊन पडले आहेत. याशिवाय नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
गेल्या महिनाभरापासून गटारीचे झाकण फुटले आहे. त्यामुळे रस्त्यावर घाण पाणी साचून दोन-तीन वाहने घसरत आहे. काहींना किरकोळ दुखापत होते; तर काहींना मोठी इजा झाली आहे.तरी सुद्धा महानगरपालिकेकडून कार्यवाही केली जात नाही.’’
- भारती घायवान, रहिवासी, क्रिस्टल सिटी
JDW25A00350