पिंपरी-चिंचवड

रावेत - किवळे गावठाण डीपी रस्त्याचे काम ‘आड वळणावर’

CD

संदीप भेगडे ः सकाळ वृत्तसेवा

किवळे, ता.२८ : रावेत येथील विकास आराखड्यातील बहुप्रतिक्षित ६० फुट रुंद रस्त्याचे काम अद्याप रखडले आहे.
स्थानिक राजकारणामुळे रावेतच्या हद्दीतील मळेकर वस्ती ते भोंडवे वस्ती भूसंपादन लटकले आहे; तर किवळे हद्दीतील कोतवालनगर येथे रस्त्याच्या मध्य रेषेपासून दोन्ही बाजूंना समान रुंदीकरण केले पाहिजे, अशी आग्रही मागणी बाधित स्थानिक नागरिकांनी केली आहे.
महापालिकेच्या ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाच्या स्थापत्य विभागाने २०१८ मध्ये रावेतगाव ते किवळेगावठाण व किवळेगावठाण ते मुकाई चौक या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले होते. त्यासाठी सुमारे ४६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. रावेत गावठाण ते मळेकर वस्ती - भोंडवे वस्ती ते किवळे गावठाण तसेच किवळे गावठाण ते कोतवालनगर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम पूर्णत्वास गेले आहे. परंतु, रावेतच्या हद्दीतील मळेकर वस्ती ते भोंडवे वस्तीपर्यंतचे भूसंपादन अद्याप झालेले नाही. त्यामुळे बऱ्याचदा वाहतूक कोंडी होऊन त्याचा स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या ठिकाणच्‍या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम महापालिकेने तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. स्थानिक राजकारणामुळे तेथील भूसंपादन रखडले आहे.
किवळे हद्दीतील कोतवालनगर येथील अर्धा किलोमीटर अंतरातील रुंदीकरणात आमच्यावर अन्याय होत असल्याची भावना बाधित स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. रस्त्याच्या मध्य रेषेपासून दोन्ही बाजूंना समान रुंदीकरण केले पाहिजे, अशी आग्रही मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. त्यासाठी काही जागामालकांनी न्यायालयाचे दार ठोठावले आहे. मात्र दोन्ही बाजूंनी समान भूसंपादन झाल्यास आमची तयारी असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

रस्ताचे ६० फुटी रुंदीकरण होणार
रावेत हद्दीत मळेकर वस्ती ते भोंडवे वस्ती असा सध्या अंदाजे २० फूट इतका रस्ता वापरात आहे. त्यामुळे तेथे नेहमी वाहतूक कोंडी होत असते. हे लक्षात घेऊन महापालिकेकडून या रस्ताचे ६० फूट रुंदीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. पुणे - बेंगलोर बाह्यवळण महामार्ग, पुलाखालून कातळे वस्ती, किवळे गावठाण, तेथून यू टर्नने कोतलवालनगरपर्यंत रुंदीकरण पूर्णत्वास गेले आहे.


समान रुंदीकरणाची मागणी
किवळे येथे बापदेव महाराज पूल ते कोतवालनगर दरम्यान अर्धा किलोमीटर अंतरात पश्चिम बाजूला जाताना डाव्या बाजूच्या बधितांनी त्यांच्यावर अधिक भूसंपादन होत असल्याच्या मुद्द्यावरून रुंदीकरणास विरोध केला आहे. त्यामुळे मूळ रस्त्याच्या मध्यभागापासून दोन्हीकडे समान रुंदीकरण करावे, अशी त्यांची मागणी आहे.

किवळे कोतवालनगर येथे रुंदीकरण हे नगररचना विभाग यांच्याकडून येणाऱ्या रेषांकनानुसार (डिमाकेशन) नुसारच केले जाईल. रावेत येथे मळेकर वस्ती ते भोंडवे वस्ती रस्त्याचे भूसंपादन अजून झालेले नाही.
- किरण अंधुरे, उपअभियंता (स्थापत्य), ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय

मळेकर वस्ती ते भोंडवे दरम्यान रुंदीकरण रखडले आहे. या मार्गात पवना नदी जवळ आमचे जुने घर ते भोंडवे लॉन्स दरम्यान रुंदीकरणासाठी महापालिकेस आमचे सहकार्य राहील. या मार्गातील अन्य बधितांबाबत मात्र महापालिकेला तोडगा काढावा लागेल.
- मधुकर भोंडवे, बाधित शेतकरी, रावेत व माजी संचालक संत तुकाराम सहकारी साखर कारखाना

कोतवालनगर येथे मूळ रस्त्याच्या मध्य भागापासून दोन्हीकडे महापालिका समांतर रुंदीकरण करणार असेल; तर रुंदीकरणास सहकार्य करण्यास आम्हा बाधितांची उद्याही तयारी असेल.
- सुधीर तरस, कोतवालनगर, किवळे

KIW25B04347

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

Latest Marathi News Live Update : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्यावर लांबच लांब रांगा

"शाहरुख खानने राडा कर दिया"; २०१२ मध्ये वानखेडेवर नेमकं काय घडलं? माजी ACP नी सर्व सांगितलं; म्हणाले, मी त्याला म्हटलंही, सर प्लीज...

भारतात सोन्याचं दर कमी होणार? RBI ने देशात परत आणलं १०४ टन सोनं

SCROLL FOR NEXT