किवळे, ता. २६ : साईनगर गहुंजे येथील ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी आचल मोरे हिची ६३ व्या नॅशनल फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. आचल ही मावळमधून निवड होणारी पहिली विद्यार्थिनी आहे. ६३ वी नॅशनल फुटबॉल ही राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा महाराष्ट्र शासन व क्रीडा विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आली असून, यात भारतातील ३६ राज्यांचे संघ सहभागी होणार आहेत. आचलच्या मेहनतीला मिळालेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे, अशी माहिती स्कूलच्या व्यवस्थापकीय संचालक पौर्णिमा बोडके, अध्यक्ष ॲड. निखिल बोडके, संचालक साहेबराव बोडके, प्राचार्य विजिला राजकुमार यांनी दिली. क्रीडा शिक्षक मनोज स्वामी यांनी आचल हिला प्रशिक्षित केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.