पिंपरी-चिंचवड

शस्त्रपूजन ही हिंदूंची प्राचीन परंपरा ः कंद

CD

किवळे, ता.३० : ‘‘शस्त्रपूजन ही तर हिंदूंची प्राचीन परंपरा पांडवकाळापासून चालत आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देखील विजयादशमी उत्सवात शस्त्रपूजन करून ही परंपरा जोपासली जात आहे. त्याद्वारे संघ शतकापासून हिंदूच्या अस्मितेला बळकटी देण्याचे काम करीत आहे,’’ असे प्रतिपादन संघाचे पिंपरी चिंचवड जिल्हा सहकार्यवाह दिलीप कंद यांनी केले.
देहूरोडनगर आयोजित विजयादशमी उत्सवात कंद हे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रवीण कुमार, देहू गटाचे संघचालक नरेश गुप्ता, नगर कार्यवाह श्रेयस बरबरे उपस्थित होते. कंद यांनी संघ स्थापनेची पार्श्वभूमी, सेवाकार्य तसेच संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांचे या राष्ट्रविषयीचे चिंतन, संघ स्वयंसेवकांचा स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग याविषयावर प्रकाश टाकला. संघाच्या शाखेद्वारे व्यक्तीनिर्माण केले जात असून या शताब्दी वर्षात संघ कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, पर्यावरण, स्वबोध, नागरी कर्तव्ये या बिंदूवर जनजागृती करीत आहे. त्यात समस्त हिंदू समाजाने सहभागी होण्याचे आग्रही आवाहन त्यांनी केले. तत्पूर्वी, पारंपरिक शस्त्रपूजन, संघ गीत, भारत मातेची प्रार्थना झाली. त्यानंतर किवळे भागात मोठ्या संख्येने गणवेशात संघ स्वयंसेवकांचे पथसंचलन पार पडले. यावेळी नागरिकांनी संचलनाचे स्वागत करून भारतमातेचा जयघोष केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Work in Germany: जर्मनीत काम करण्याची सुवर्णसंधी; 7 लाखांहून अधिक पदं रिक्त, कोणत्या क्षेत्रात मिळू शकते नोकरी?

Omkar Elephant : ‘ओंकार’ हत्तीचा धुमाकूळ, आणखी ५ हत्तींच्या कळपाने वनविभागाला दिलं आव्हान

Crime News : जामिनावर सुटलेल्या खुनाच्या संशयिताची मिरवणूक काढणे तरुणांना भोवले; नाशिक रोड पोलिसांनी काढली धिंड

"आम्ही ठरवून एकमेकींना फॉलो करत नाही" दीपिकासोबत भांडणाच्या चर्चांवर फराहचं स्पष्टीकरण ; म्हणाली..

Nashik News : उत्सव नवरात्रीचा तयारी महापालिकेची!; साडेतीन वर्षांची कसर भरण्यासाठी इच्छुकांकडून ‘इव्हेंट्स’ची धूम!

SCROLL FOR NEXT