पिंपरी-चिंचवड

देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीत मुरूम टाकून तात्पुरता दिलासा

CD

देहूरोड, ता. १६ : कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून हद्दीतील झेंडेमळा ते जाधव मळा तसेच कारके मळा ते जाधव पाटील मळा या रस्त्यांवर मुरूम टाकण्यात आल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र मागील अनेक वर्षांपासून या रस्त्याचे डांबरीकरण प्रलंबित असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
परिसरातील नागरिक नियमितपणे कॅन्टोन्मेंट बोर्डाला कर भरत असतानाही मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याचा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे. या रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे.
तत्कालीन आमदार संजय भेगडे तसेच विद्यमान आमदार सुनील शेळके यांच्या कार्यकाळात या रस्त्यासाठी निविदा काढण्यात आली होती. डांबरीकरणाची प्रक्रिया देखील सुरू झाली होती; मात्र स्थानिक लष्कराच्या विरोधामुळे हे काम पूर्ण होऊ शकले नाही.
झेंडेमळा ते हगवणे मळा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना रोजच्या प्रवासात अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकरी, विद्यार्थी आणि स्थानिक रहिवासी या रस्त्याचा नियमित वापर करत असल्याने तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी होत आहे.

मागील अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सध्या मुरूम टाकल्याने दिलासा मिळाला असला तरी कायमस्वरूपी डांबरीकरण करणे गरजेचे आहे.
- पंडितराव जाधव, स्थानिक शेतकरी

कॅन्टोन्मेंटला नियमित कर भरूनही रस्त्यासारख्या मूलभूत सुविधांसाठी नागरिकांना वाट पाहावी लागत आहे. लोकप्रतिनिधींनी याबाबत लवकर तोडगा काढावा.
- अविनाश जाधव पाटील, स्थानिक शेतकरी

रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रोज ये-जा करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
- उमेश कारके, स्थानिक शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Close : आज शेअर बाजार हिरव्या रंगात बंद! सेन्सेक्स ९३९ अंकांनी वधारला तर निफ्टी २५८ अंकांनी वर, कोणते शेअर्स फायद्यात? पाहा

अरे तो वाघ आहे...! विदर्भात लोकांचा मुर्खपणा, मोबाईल कॅमेरा घेऊन जंगलच्या राजाचा पाठलाग, VIDEO VIRAL

Mpsc Success Story: बेस्ट वाहकाचा मुलगा बनला पाेलिस उपनिरीक्षक, सूरज गोळेची प्रतिकूल परिस्थितीवर करत यशाला गवसणी; आई राबतेय शेतात!

Latest Marathi Update : कांदिवलीमध्ये घरगुती गॅस सिलेंडर घेण्यासाठी मोठी गर्दी

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! राज्यात मुक्त शिक्षण व्यवस्था राबवणार, शिक्षण विभागाचा नवा प्लॅन, नेमकी योजना काय?

SCROLL FOR NEXT