पिंपरी-चिंचवड

श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त किवळेत अखंड हरिनाम सप्ताह सुरू

CD

किवळे, ता. २६ : किवळे येथील मुकाई चौकातील हनुमान मंदिरात यंदा १३ व्या वर्षी हनुमान जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाला गुरुवारी (ता.२६) प्रारंभ झाला. हा सप्ताह हनुमान जयंती अर्थात २ एप्रिलपर्यंत चालणार आहे.
या सप्ताहादरम्यान दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, सकाळी काकड आरती, महिला भजन, हरिपाठ, सायंकाळी कीर्तन आणि रात्री हरिजागर असे कार्यक्रम भक्तांसाठी ठेवण्यात आले आहेत.
सप्ताहात दररोज नामवंत कीर्तनकार व भजनी मंडळांचा सहभाग राहणार आहे. यामध्ये रामलिंग महाराज मोहिते, गणेश महाराज गोलांडे, रामेश्वर महाराज इंगळे, नारायण महाराज खंदारे, रामायणाचार्य अशोक महाराज हुंबे, गायनाचार्य उत्तम महाराज बडे, गाथामूर्ती तुकाराम महाराज धाडगे या कीर्तनकारांची कीर्तने होणार आहेत.
हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी ६.३० वाजता जन्मोत्सव सोहळा पार पडणार असून सकाळी १० ते १२ या वेळेत महंत बबन महाराज खेडकर (चिंचोशी, पुणे) यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. दुपारी १२ ते ३ महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संयोजक विष्णू हपसे, नारायण हापसे, दत्तात्रेय हापसे, राहुल हापसे, सागर हापसे, सनील हापसे, किरण हापसे, रमेश गराडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तू I Love You म्हणाली नाहीस? प्राध्यापकाने भरवर्गात केलं प्रपोज, वाटायला चॉकलेट्सही आणली; विद्यार्थीनीने...

Fuel Storage: भारतात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा किती दिवसांचा साठा शिल्लक आहे? केंद्र सरकारने आकडा सांगून विषयच संपवला!

Farmer News : शेतकऱ्याचा जीव 'मुठीत' अन् वीज 'रात्री'त! माहूर तालुक्यात महावितरणच्या धोरणामुळे बळीराजा मृत्यूच्या छायेत.

अप्सरा बनली मंजुळा ! सालबर्डी सिनेमात सोनालीचा दिलखेचक अंदाज आणि भन्नाट डान्स

Vaibhav Suryavanshi उद्यापासून टीम इंडियाच्या सीनियर संघासाठी पात्र ठरणार; IPL 2026 नंतर कोहली, रोहितसोबत खेळणार...

SCROLL FOR NEXT