Printed Wedding Card sakal
पिंपरी-चिंचवड

Wedding Cards : छापिल लग्नपत्रिकांची पुन्हा ‘चलती’

कोरोनाच्या काळात मर्यादित वऱ्हाडी मंडळींमध्ये लग्नपद्धती सुरू झाली होती. त्यावेळी सरसकट डिजिटल पत्रिका देण्याची नवी पद्धती उदयाला आली.

दिनेश टाकवे

कामशेत - कोरोनाच्या काळात मर्यादित वऱ्हाडी मंडळींमध्ये लग्नपद्धती सुरू झाली होती. त्यावेळी सरसकट डिजिटल पत्रिका देण्याची नवी पद्धती उदयाला आली. ती लोकांनी स्वीकारलीही. त्यामुळे छापील पत्रिका कालबाह्य होणार असे वाटत होते. मात्र, कोरोनाचा प्रभाव कमी होताच धनदांडग्यांचे विवाह थाटामाटात सुरू झाले आणि पुन्हा एकदा छापिल पत्रिका करण्याकडे कल आहे. या उलट मध्यमवर्गीय आणि सामान्य कुटुंबातील लग्नाचे निमंत्रण मात्र अजूनही डिजिटल पत्रिका पाठवूनच दिली जाते.

तुळशीचे लग्न लागले की लग्नसराईला प्रारंभ होतो. त्यानंतर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत म्हणजे वैशाख महिन्यापर्यंत विवाहाचे मुहूर्त असतात. कोरोना काळात लग्नपद्धतीत आमूलाग्र बदल झाला होता. वीस लोकांमध्ये लग्नाची परवानगी असल्याने त्या काळात सामान्य कुटुंबातील मुला-मुलींचे विवाह मोठ्या प्रमाणात झाले. त्यावेळी उच्च मध्यमवर्गीय आणि श्रीमंत कुटुंबांतील लग्नांमध्येही संख्येला मर्यादा होती. त्यामुळे या गटातील विवाह हे छोटेखानी पद्धतीने हॉटेलमध्ये लावले जात होते. संपर्क वाढल्याने कोरोनाचा प्रादूर्भाव होत असल्याने सर्व स्तरातील विवाहांची निमंत्रणे डिजिटल पत्रिकेद्वारेच दिली जात होती.

मात्र, जसजसा कोरोनाचा प्रभाव कमी झाला. सर्व जीवन पूर्वपदावर आल्यावर श्रीमंत स्तरातील मंडळींनी विवाह सोहळे शाही पद्धतीने होऊ लागले. त्यामुळे त्यांनी छापिल पत्रिका काढण्याकडे कल पुन्हा एकदा सुरू झाला आहे. सर्वसामान्य गरीब-मजूर कुटुंबीयांना छापिल पत्रिकांचा खर्च परवडणारा नाही. आधुनिक काळात डिजिटल पत्रिका सर्वच स्तरातील लोकांना फायदेशीर असल्याचे मत नागरिक व्यक्त करतात. छापील एका पत्रिकेला पाच ते दीडशे रुपये दर असल्याने हजारो रुपये खर्च होतो. त्याचवेळी डिजिटल पत्रिकेला केवळ शंभर रुपये खर्च येतो.

डिजिटल निमंत्रण पत्रिका अन् खर्चात बचत

डिजिटल पत्रिकाच सर्वसामान्य लोकांच्या पसंतीस पडली आहे. व्हाट्सॲप, फेसबुकसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून निमंत्रण क्षणात सर्वांपर्यंत पोचविणे शक्य होत आहे. त्यामुळे गावोगावी जाऊन पत्रिका देणे देणे बंधनकारक राहिले नाही. निमंत्रण देण्यासाठी लागणारा वेळ, पैसा यात मोठ्या प्रमाणात बचत होते.

‘लग्नपत्रिकांचे काम पहिल्यासारखे आता राहिले नाही. सध्या केवळ श्रीमंत कुटुंबांतील लग्नाच्या पत्रिकांचे काम येते. त्यालाही मर्यादा आहेत. पूर्वी लग्नाच्या हंगामात उसंत नसायची. आता तो प्रकार जवळपास बंदच होत चालला आहे.’

- अमोल येवले, कामशेत

‘डिजिटल पत्रिका करण्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सध्याच्या काळात पत्रिकांबरोबर सुविचार संदेश, शुभेच्छांचे बॅनरचे डिझाईन डिजिटल फॉर्ममध्ये करून घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.’

- सत्यम घुले, कातवी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Women’s World Cup 2025 Ind vs Pak : आज भारत-पाकिस्तान आमनेसामने, महिला खेळाडू हस्तांदोलन करणार?

MPSC 2025: खुल्या प्रवर्गाने परीक्षा द्यायची नाही का? ‘राज्य कर निरीक्षक’ पदासाठी शून्य जागा; विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai News: मुंबईच्या गजबजाटात हरवलेल्या दोन मुलींना शोधण्याची आईची धडपड, पोलिसांची रात्रंदिवस मेहनत

Mahashtra Farmers : अतिवृष्टीमुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, उत्पादनात घट

Pune : आंदोलन करण्यावरून राष्ट्रवादीच्या दोन गटात बाचाबाची; शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की

SCROLL FOR NEXT