पिंपरी-चिंचवड

गरजूंच्या वैद्यकीय मदतीसाठी ‘आरोग्य मित्र’

CD

लोणावळा, ता. २१ः लोणावळा परिसरात सर्वसामान्य गरजू नागरिकांना वैद्यकीय मदतीसाठी लोणावळ्यात माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांच्या पुढाकारातून आरोग्य मित्र मेडिकल फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. लोणावळ्यात पुजारी यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली. लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्ष व फाउंडेशनच्या सदस्य सुरेखा जाधव माजी पोलिस कर्मचारी दिलीप आंबेकर, नंदकुमार खंडेलवाल, विकी पालरेचा, अभिजित गायकवाड, विशाल पाडाळे, अनिल गायकवाड, हर्षल होगले, आशिष बुटाला आदी यावेळी उपस्थित होते.
सध्या आरोग्य सेवा सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेली आहे. नागरिकांना शासकीय योजनांची माहिती नाही. वेळेत आवश्यक वैद्यकीय सुविधा, मदत मिळत नाही. वैद्यकीय सेवेचे अव्वाच्या सव्वा दर आकारले जात आहेत. शहरी, ग्रामीण भागात आरोग्य सुविधा, वैद्यकीय मार्गदर्शन, मदत मिळावी यासाठी आरोग्य मित्र फाउंडेशनचे रोपटे रोवण्यात आले असल्याचे संस्थापक अध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी सांगितले. संस्थेच्या माध्यमातून वैद्यकीय आणि मार्गदर्शन शिबिर, रक्तदान शिबिरांचे आयोजन, रुग्णवाहिकेची उपलब्धता, रुग्णांना माफत दरात औषधे, वैद्यकीय चाचण्या, उपचार करून देणे, योग तसेच गर्भसंस्कार शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. लोणावळा शहर व परिसरातील शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या, आर्थिक कुवत व शासकीय योजनांबाबत माहिती नसलेल्या रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी योग्य मार्गदर्शन व मदत पुरवणे, तातडीचे वैद्यकीय उपचार वेळेत मिळावे, वैद्यकीय मदतीसाठी उपलब्ध असलेल्या सरकारी योजनांचा लाभ घेता यावा हा ‘आरोग्य मित्र’चा प्रमुख उद्देश असल्याचे पुजारी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 10 नक्षलवाद्यांच्या मृतदेहांसह शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त

SCROLL FOR NEXT