पिंपरी-चिंचवड

शिष्यवृत्ती परीक्षेत कार्ल्याचे विद्यार्थी चमकले

CD

लोणावळा, ता. ८ : ‘राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती’ परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. या परीक्षेत कार्ला येथील श्री एकवीरा विद्यामंदिर शाळेचे नऊ विद्यार्थी चमकले आहेत. तर चार विद्यार्थ्यांना राज्य सरकारच्या सारथी योजनेंतर्गत छत्रपती राजाराम महाराज शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे.
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित कार्ला येथील श्री एकवीरा विद्यामंदिर शाळेचे २२ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २० विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर नऊ विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत.
खुला गटातून स्नेहल शिंदे, आर्या अहिरे, पल्लवी ढमाले, रोहन ससाणे, सलमान शेख, प्रांजली भानुसघरे, इतर मागास वर्गात नवाज शेख, अनुसूचित जाती गटात पल्लवी शिंदे, अनुसूचित जमाती गटातून यश बैकर हे विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी १५ हजार याप्रमाणे प्रत्येकी ६० हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. तर अक्षरा गरुड, ईश्वरी गरुड, आर्या गरुड, विघ्नेश बुरूटे या विद्यार्थ्यांनी छत्रपती राजाराम महाराज शिष्यवृत्ती प्राप्त केली. यांना विद्यालयातील अध्यापक उमेश इंगुळकर यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, नंदकुमार शेलार, राजेश म्हस्के, शालेय समिती अध्यक्ष सोनबा गोपाळे, कार्ल्याच्या सरपंच दीपाली हुलावळे, उपसरपंच किरण हुलावळे, प्राचार्य कैलास पारधी आदींसह ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थी विद्यालयातील शिक्षक यांचे कौतुक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण

SCROLL FOR NEXT