पिंपरी-चिंचवड

कुसगाव ग्रामपंचायतीचे चार सदस्य अपात्र सरकारी जागेत अतिक्रमण केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

CD

लोणावळा, ता. ११ ः मावळ तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कुसगाव बुद्रूक ग्रामपंचायतीच्या चार सदस्यांवर सरकारी जागेत अतिक्रमण केल्याप्रकरणी अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे.
ग्रामपंचायत सदस्य गणेश वसंत गुंजाळ, सुजाता रामचंद्र ठुले, फरिन मज्जिद शेख, शैला भरत मोरे यांनी कुसगाव ग्रामपंचायत हद्दीतील सरकारी गायरान जागेत अतिक्रमण करत सरकारी जागेचा बेकायदा वापर केला आहे. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व कायद्याने अपात्र होत असल्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी तक्रार माजी सदस्य भगवान ऊर्फ दादा डफळ, संदीप मानकर, प्रकाश साळवे, उमेश शेळके यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे केली होती. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ ज (३) चा संदर्भ देण्यात आला होता.
या अर्जावर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या दालनात वेळोवेळी सुनावणी झाली.
अर्जदारांनी सादर केलेली कागदपत्रे व ग्रामसेवक व गटविकास अधिकारी, मंडलाधिकारी, तहसीलदार यांचे अहवाल तपासून जिल्हाधिकारी यांनी अर्जदारांचा विवाद अर्ज मंजूर करत, वरील चार सदस्यांना सदस्यपदी राहण्यास अपात्र ठरवले. अर्जदारांच्यावतीने विधीज्ञ अमित आव्हाड, सोपान मुंढे, योगेश गराडे यांनी युक्तिवाद केला.
कुसगाव बु. ही १७ सदस्यीय ग्रामपंचायत आहे. सन २०२१ मध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक झाली होती. सत्ताधारी गटाकडे दहा तर विरोधी गटाकडे सात असे बलाबल आहे.
सत्ताधारी गटातील राजेश काटकर यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवत, त्यांचेही सदस्यत्व यापूर्वी रद्द ठरविण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला देत तब्बल चार सदस्यांवर अपात्रतेची कारवाई झाल्याने मावळ तालुक्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईनंतर विरोधी गटात आनंदाचे वातावरण आहे. संबंधितांच्या प्रभागात पोटनिवडणूक लागणार की ग्रामपंचायतीवर प्रशासक राज येणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT