लोणावळा, ता. ११ : मावळ तालुक्यातील नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळाच्या कार्ला येथील श्री एकवीरा विद्यामंदिर शाळेतील दोन विद्यार्थी आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृती (एनएमएमएस) परीक्षेत पुणे जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले आहेत. तर सहा विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीमध्ये पात्र झाले आहेत.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या वतीने घेण्यात आलेल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृती परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात श्री एकवीरा विद्यामंदिरातील प्राची भानुसघरे, विशाल उगले या दोन विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. त्यांना पुढील शिक्षणासाठी साठ हजार रुपये शिष्यवृती मिळणार आहे. तसेच, महाराष्ट्र शासनाच्या सारथी योजनेअंतर्गत छत्रपती राजाराम महाराज शिष्यवृत्तीसाठी हर्षदा पडवळ, कृष्णाई हुलावळे, श्रावणी बोरकर, सिद्धेश मोरे, विराज भानुसघरे, आदित्य देवकर या सहा विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. शिक्षक उमेश इंगुळकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, संतोष खांडगे, नंदकुमार शेलार, राजेश म्हस्के, शालेय समिती अध्यक्ष सोनबा गोपाळे, मुख्याध्यापक संजय वंजारे, सरंपच दीपाली हुलावळे, उपसरपंच अभिषेक जाधव आदींनी अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.