पिंपरी-चिंचवड

विद्यार्थ्यांसाठी चाकोरी बाहेरचे प्रयत्न हवेत

CD

लोणावळा, ता.११ : ‘‘विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी शिक्षकांनी चाकोरी बाहेर जाऊन प्रयत्न करावेत,’’ असे आवाहन पुणे जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी केले.
जिल्हा परिषद माध्यमिक विभाग, पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील डी.सी. हायस्कूल येथे आयोजित तज्ञ विषय शिक्षक कार्यशाळेत कारेकर हे बोलत होते.
यावेळी लोणावळा नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, हनुमंत कुबडे, शिवाजीराव किलकिले, अरुण थोरात, सुरेश कांचन, कल्याण बरडे, हरिश्चंद्र गायकवाड, सुजित जगताप, उत्तम पोटवडे, आबा जाधव, संभाजी पडवळ, सुबोध गलांडे, दत्तात्रय चाळक, शिवाजी शिंदे, किशोर बोरसे, दिलीप काळे आदी उपस्थित होते.
कार्यशाळेत राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव नंदकुमार सागर यांच्यासह तज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी एसएससी बोर्डाचे प्रश्नपत्रिका निर्माते तथा पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे सदस्य डॉ. नंदा भोर (मराठी), डॉ. सुवर्णा देशपांडे (गणित), डॉ. शिवानी लिमये (इतिहास), गजानन गोसावी (हिंदी), रुपेश ठाकूर (विज्ञान), अखिलेश भोसले (इंग्रजी), राहुल प्रभू (भूगोल) यांनी मार्गदर्शन केले. विषय समन्वय म्हणून सोमनाथ चौधर (मराठी), लतीफ शेख (हिंदी), मनोज नायकवडी (इंग्रजी), भारत काळे (गणित), रोहिदास एकाड (विज्ञान), सचिन दुर्गाडे (इतिहास) यांनी काम पाहिले. जिल्हा कार्याध्यक्ष राजेश गायकवाड, डी.सी.स्कूलचे प्रशासकीय अधिकारी हालागेरी बसवराज, विद्या समिती अध्यक्ष सुधाकर जगदाळे, भानुदास रिठे, विठ्ठल माळशिकारे, सचिव विकास तारे, सईद नल्लामंदू यांनी विशेष परिश्रम घेतले.
मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रसाद गायकवाड यांनी प्रस्ताविक केले.शिवाजी कामथे यांनी स्वागत केले. रमेश फरताडे यांनी सूत्रसंचालन केले. नामदेव गाभणे यांनी आभार मानले.
LON25B04332

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT