लोणावळा, ता. १ : रोटरी क्लब लोणावळ्याच्या अध्यक्षपदी विजया कल्याण यांची निवड करण्यात आली आहे. हॉटेल चंद्रलोक येथे रोटरी इंटरनॅशनलचे माजी संचालक डॉ. महेश कोटबगी, असिस्टंट गव्हर्नर भालचंद्र लेले यांच्या हस्ते हा पदग्रहण सोहळा संपन्न झाला.
मागील वर्षाचे अध्यक्ष नारायण शारवले, सचिव मोनाली कुलकर्णी, खजिनदार जयवंत नलोडे यांनी आपला पदभार नवनिर्वाचित अध्यक्षा विजया कल्याण, सचिव मुस्तफा कॉन्ट्रॅक्टर व खजिनदार दुरिया रामपूरवाला यांच्याकडे सुपूर्द केला. त्याचबरोबर नूतन कार्यकारिणीत मोनाली कुलकर्णी-शेलार (उपाध्यक्ष), वृंदा गणात्रा (सेवा प्रकल्प), डॉ. डॉली अग्रवाल, खादिजा एम. (वैद्यकीय सेवा), दिलीप पवार, वृंदा गणात्रा (सदस्यता संचालक), कौस्तुभ दामले (फाउंडेशन संचालक), रवींद्र कुलकर्णी (जनसंपर्क), तस्नीम बोहरी आणि वैशाली (नवीन जनरेशन संचालक), जयवंत नालोडे (फेलोशिप डायरेक्टर), नितीन कल्याण (आयटी व सीएसआर डायरेक्टर), पुंडलिक वानखेडे, अजय अरगडे आणि श्रीकृष्ण वर्तक (क्लब फॅलिसिटेटर) यांचा समावेश आहे. विशेष कार्य करणाऱ्या सदस्यांचा यावेळी गौरव झाला. ॲड. मोनाली कुलकर्णी यांनी गेल्या वर्षीच्या कार्याचा आढावा घेत अहवाल वाचन केले. रवींद्र कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. नितीन कल्याण यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.