लोणावळा, ता. १ : तुंगार्लीचे ग्रामदैवत जाखमाता देवी मंदिर व शेजारच्या हनुमान मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडली. यात सुमारे वीस हजार रुपये होते, अशी तक्रार पोलिसांत देण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी (ता.१) सकाळी उघडकीस आली. विशेष म्हणजे चोरट्यांनी ही दानपेटी लांबवत ती जवळच्या मैदानात नेऊन फोडली.
मंदिराचे पुजारी दत्ता वाघोले हे सकाळी पूजेसाठी आले असता, त्यांना चोरीचा प्रकार समजला. त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांना याची खबर देत पोलिसात तक्रार दिली. हनुमान मंदिरातील चोरीचे सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आले आहे. रेनकोट घातलेला एक जण दानपेटी उचलून घेऊन जात असल्याचे दिसत आहे. आजूबाजूच्या परिसरांमधील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासण्याचे काम सुरू आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये लोणावळ्यातील मंदिरांमध्ये चोरीच्या घटनांचा आलेख वाढत आहे. दीड महिन्यांत चोरट्यांनी मंदिरात चोरी केल्याची ही पाचवी घटना आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.