पिंपरी-चिंचवड

बोरघाटामध्ये मालगाडी घसरली पुण्याकडे येणारी रेल्वेवाहतूक विस्कळित बोरघाटात घसरला पुण्याकडे येणारी रेल्वे वाहतूक विस्कळित

CD

लोणावळा, ता. ११ ः मुंबई- पुणे लोहमार्गावर बोरघाटात ठाकूरवाडी ते मंकी हिल दरम्यान रेल्वेच्या मध्य मार्गिकेवर शुक्रवारी (ता. ११) दुपारी साडेतीनच्या सुमारास मालगाडीची वाघीण (वॅगन) घसरली. यामुळे पुण्याकडे येणारी वाहतूक दोन तास विस्कळित झाली.
रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरघाटात ठाकूरवाडी सोडल्यानंतर मंकी हिलजवळ रेल्वे किलोमीटर क्र.११८ जवळ मालगाडीची शेवटची वाघीण रुळावरून घसरली. ही घटना घडूनही गाडीचा वेग मर्यादित असल्याने मोठी हानी झाली नाही. मालगाडीचे कपलिंग तुटल्याने हा अपघात झाला असावा, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.
सुदैवाने, या घटनेत कोणतीही मोठी हानी झाली नाही. याचदरम्यान पाठीमागून लगोलग येणारी चेन्नई सेंट्रल एक्स्प्रेस घाटात तातडीने थांबविण्यात आली. मुंबई-भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेस ही बदलापूर ते अंबरनाथ दरम्यान, हैदराबाद एक्स्प्रेस ही नेरळ दरम्यान तर यशवंतपूर एक्स्प्रेस या गाड्या कर्जतदरम्यान थांबविण्यात आल्या. रेल्वे प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीचे काम हाती घेतले. तर प्रगती एक्स्प्रेस दीड तास उशिराने निघाली. रेल्वे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करत दोन तासानंतर वाहतूक सुरळीत करण्यात यश मिळवले.

फोटो ः 04461

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sambhajiraje Chhatrapati: शिवरायांचा उज्ज्वल इतिहास जागतिक स्तरावर पोहोचणार, मात्र...; संभाजीराजे छत्रपतींची राज्यसरकारकडे मागणी!

Wimbledon 2025 : विम्बल्डनची नवी राणी कोण? स्विअतेक-ॲनिसिमोवा एकेरीची अंतिम लढत

Misfire: मित्राला पिस्टल दाखवत होता, अचानक सुटली गोळी; समृद्धी महामार्गाच्या टोल नाक्यावरील घटना

Maharashtra Sahitya Parishad : ‘मसाप’ पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा; कृती समितीकडून धर्मादाय आयुक्तांकडे मागणी

Parbhani News: संस्थाचालकाने केलेल्या मारहाणीत पालकाचा मृत्यू; निवासी शाळेत घटना, दांपत्याविरुद्ध गुन्हा

SCROLL FOR NEXT