लोणावळा, ता.२ : लोणावळा परिसरात यंदा गणेश मंडळांच्यावतीने शिवकालीन ऐतिहासिक देखाव्यांवर भर देण्यात आला आहे. याचबरोबर काही मंडळांनी धार्मिक व पौराणिक देखावेही साकारले आहेत. पावसाने दमदार हजेरी लावल्याने कार्यकर्ते व भाविकांचा काहीसा हिरमोड झाला असला तरी त्यांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. सामाजिक उपक्रम, स्वच्छता व आरोग्य, पर्यावरण जागृती आदी विषयांसह नशामुक्तीवरही जनजागृती करण्यात येत आहे.
गणेशमूर्तीचे आकर्षण
मानाचा पहिला गणपती असलेल्या रायवूड गणेश मंडळाचे यंदाचे ९९ वे वर्ष असून मंडळाची गणेश मूर्ती भाविकांचे आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. विलास बडेकर हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.
सजावटीवर भर
गावठाण येथील श्री संत रोहिदास तरुण मंडळाचे यंदाचे ८७ वे वर्ष आहे. मंडळाच्यावतीने सजावट करण्यात आली आहे. नीतेश शिंदे हे अध्यक्ष आहेत.
विविध सामाजिक उपक्रम
वळवण येथील शेतकरी भजनी मंडळाचे ८७ वे वर्ष आहे. मंडळाच्यावतीने विविध धार्मिक, शैक्षणिक, क्रीडा व सामाजिक उपक्रमांसह ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
शिश महाल
टेबल लॅण्ड येथील श्री नवयुग महाराष्ट्र मित्र मंडळाचे ६८ वे वर्ष आहे. मंडळाने यंदा शिश महाल साकारला आहे. श्रेयश खानोलकर हे अध्यक्ष आहेत.
सांस्कृतिक कार्यक्रम
लोणावळ्यातील सर्वात जुन्या भांगरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
लालबागच्या राजाची प्रतिमूर्ती
पोस्टमनचाळ येथील श्री जय महाराष्ट्र गजानन मित्र मंडळाचे ४७ वे वर्ष आहे. मंडळाची लालबागच्या राजाची मूर्ती लक्षवेधक आहे. तौफिक शेख हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.
फुलांची सजावट
शिवाजी उदय मित्र मंडळाचे ६६ वे वर्ष असून सुनील बोरकर अध्यक्ष आहे. मंडळाने फुलांची आकर्षक सजावट केली आहे.
आकर्षक आरास
रेल्वे पोर्टर चाळ येथील श्री साई आझाद मित्र मंडळ, नांगरगाव जयहिंद मित्र मंडळ, गणेश मित्र मंडळ, भांगरवाडी येथील श्री शिवाजी युवक मित्र मंडळ, इंद्रायणीनगर मित्र मंडळ, इराणी चाळ नटराज मित्र मंडळ, खंडाळा येथील नवजीवन मित्र मंडळाच्यावतीने आकर्षक सजावट करण्यात आली आहे. दत्तवाडी कुसगाव येथील नवनाथ मित्र मंडळाचे ३३ वे वर्ष आहे. आकर्षक सजावट करण्यात आली आहे. याच भागातील श्री नवनाथ मित्र मंडळाचे यंदा ३३ वे वर्ष असून आकर्षक सजावट केली असून विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक उपक्रम आयोजिले आहेत.
शिवरायांच्या गडकोटांचे महत्व
रायवूड येथील तरुण मराठा मंडळाचे ९३ वे वर्ष आहे. अमित चव्हाण हे अध्यक्ष असून शिवरायांच्या गडकोटांचे महत्व हा देखावा सादर केला आहे.
युनेस्कोची वारसास्थळे
गवळीवाडा सार्वजनिक गणेश मंडळाचे यंदाचे ८७ वे वर्ष आहे. शिवरायांचे १२ किल्ले युनेस्कोच्या वारसा स्थळांच्या यादीत हा देखावा साकारला आहे. संदीप लोंढे हे अध्यक्ष आहे.
स्वराज्याची शपथ
प्रियदर्शनी संकुल येथील अष्टविनायक मित्रमंडळाचे ४७ वर्ष आहे. स्वराज्याची शपथ ऐतिहासिक देखावा सादर केला असून लहू
गायकवाड अध्यक्ष आहेत.
राजमाता जिजाऊ गड
श्रीमंत नेहरू मित्र मंडळाचे ५२ वे वर्ष आहे. हिराचंद ओसवाल हे अध्यक्ष आहेत. मंडळाने जगदंब राजमाता जिजाऊ गड साकारला आहे.
रायरेश्वराची शपथ
तुंगार्ली येथील ओंकार तरुण मंडळाचे ४८ वे वर्ष आहे. ज्ञानेश्वर येवले हे मंडळाचे अध्यक्ष आहेत. मंडळाच्यावतीने छत्रपती शिवरायांची रायरेश्वर येथील स्वराज्याची शपथ हा ऐतिहासिक देखावा साकारला आहे.
तुळजाभवानी मंदिराची प्रतिकृती
मावळचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिवाजी मित्र मंडळाच्यावतीने यंदा तुळजापूर येथील आई तुळजाभवानी मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. प्रकाश चौहान हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.
अष्टविनायक दर्शन
अखिल महात्मा फुले भाजी मंडई व फळ मार्केटच्यावतीने अष्टविनायक दर्शन हा देखावा साकारला आहे. राजू बोराटी हे अध्यक्ष आहेत. मंडळाचे यंदाचे ७९ वे वर्ष आहे.
विष्णु पुराण
नाकोडा कॉम्प्लेक्समधील श्री राणा प्रताप नेताजी मित्र मंडळाचे यंदाचे ८८ वे वर्ष आहे. विष्णू पुराण हा हालता देखावा साकारला आहे. आयुष कांकरिया हे अध्यक्ष आहेत.
श्री दत्त अवतार
मावळा पुतळा येथील तानाजी युवक मित्र मंडळाने ‘श्री दत्त अवतार’ हा धार्मिक देखावा सादर केला आहे. मंडळाचे यंदाचे ५८ वे वर्ष असून आशिष पांव हे अध्यक्ष आहेत.
स्वामी समर्थ दर्शन
प्रियदर्शिनी संकुल येथील तुफान मित्र मंडळाचे ६१ वे वर्ष आहे. तिथी खंडेलवाल मंडळाच्या अध्यक्षा आहेत. स्वामी समर्थ दर्शन हा देखावा साकारला आहे.
संयुक्त महाराष्ट्र चळवळ
गावठाण येथील महाराष्ट्र मातंग समाजाचे ७५ वे वर्ष आहे. रितेश बोभाटे हे अध्यक्ष आहेत. मंडळाच्यावतीने ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ’ हा जिवंत देखावा साकारला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.