पिंपरी-चिंचवड

कासारसाई येथील तरुणाची लोणावळ्यात आत्महत्या

CD

लोणावळा, ता. १२ : काही व्यक्तींच्या त्रासाला कंटाळून युवकाने लोणावळ्यातील लायन्स पॉइंट येथे दरीत उडी मारत आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (ता.१२) उघडकीस आली. या प्रकरणात आठ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दाखल केला आहे.
विरेंद्र वाल्मिकी सिन्हा (वय ३३, रा. व्हिलेज रेसिडन्सी, कासारसाई, मूळ न्यू मानकापूर, नागपूर) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. याबाबत त्यांची पत्नी रिया यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मिलिंद दाणी, सिद्धांत सपकाळ, अभिषेक बिरोले यांच्यासह पाच महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘विरेंद्र यांनी गुरुवारी पहाटे पत्नीच्या नावे परिचिताच्या मोबाइलवर संदेश पाठवला होता. त्यात ‘‘आपली गाडी टायगर पॉइंट येथे उभी असून, चावी टायरखाली आणि मोबाइल गाडीत आहे,’’ असे म्हटले होते. दरम्यान, सकाळी रिया आणि मित्रमंडळी तेथे आले. तेव्हा निळ्या रंगाची मोटार क्र. डब्ल्यूबी ०६-झेड ९८५८ तेथे दिसली. तर, गाडीतील मोबाइलमध्ये विरेंद्र यांनी स्वतःचे व्हिडिओ रेकॉर्डिंग कंपनीच्या अधिकाऱ्यांना ई-मेलद्वारे पाठविल्याचे दिसले. काही व्यक्तींनी मानसिक त्रास दिल्याचा आरोप करत विरेंद्र यांनी काही नावांचा उल्लेख व्हिडिओमध्ये केला आहे.’’
या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दिनेश तायडे, पोलिस उपनिरीक्षक सागर अरगडे आणि शिवदुर्ग मित्रमंडळ रेस्क्यू टीमने पाच तास मोहीम राबवत विरेंद्र यांचा मृतदेह शोधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Goregaon Drugs Party: ''मला एक पिवळी गोळी खायला दिली...'' शुद्धीवर आलेल्या तरुणीचा जबाब; पार्टीतली 'नो कॅमेरा पॉलिसी' काय होती?

'होय मी जयभीमवाली' चिन्मयी सुमीतनं मांडलं स्पष्ट मत, म्हणाल्या... 'मी आंबेडकरांची फॅन आहे आणि जय भीम म्हणण्यामागे...'

Latest Marathi News Live Update: नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, CBIचे अधिकारी लंडनमध्ये

भाविकांच्या बसचा भीषण अपघात, ६ जणांचा जागीच मृत्यू, २५ जखमी

Pune Yerwada News: पुण्यातील येरवडा प्रादेशिक मनोरुग्णांची हेळसांड थांबवा; सहसंचालक डॉ. गोल्‍हाइत यांच्या अधिकाऱ्यांना सूचना..

SCROLL FOR NEXT