पिंपरी-चिंचवड

लोणावळ्यात बनावट खरेदीखत; दहा जणांवर गुन्हा; पाच अटकेत

CD

लोणावळा, ता. १८ : वडिलांच्या मालकीच्या जमिनीबाबत बनावट कागदपत्रे तयार करून खरेदीखत नोंदणीचा प्रयत्न केल्याप्रकरणी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात दहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून, पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी हर्ष प्रवीणचंद्र परमार (वय ४२, रा. गुलालवाडी, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे.
एकनाथ शंकर जांभूळकर, शैलेश सुरेश ओव्हाळ, शंकर भागूजी ओव्हाळ, अनिकेत ओव्हाळ, बुवा ऊर्फ गुलाब जाधव, ऋषिकेश ओव्हाळ (सर्व रा. कुरवंडे, लोणावळा), गौतम सपकाळ (रा. खंडाळा), नासिर आराकटी (रा. लोणावळा), शेखर पाटील व एक अनोळखी अशा दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्ष परमार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे वडील प्रवीणचंद्र परमार यांनी मावळ तालुक्यातील कुरवंडे येथे जमिनी खरेदी केल्या होत्या. वडिलांच्या निधनानंतर काही व्यक्तींनी संगनमताने जुन्या स्टॅम्पपेपरचा गैरवापर करून गट क्रमांक २६७ या जागेचे बनावट खरेदीखत तयार केले. त्यानंतर दस्तऐवजावर खोटी सही करून व नोंदणी कार्यालयात शुल्क भरल्याचे भासवून ही जमीन स्वतःच्या नावे करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच, जिल्हा निबंधक कार्यालयात चलनाद्वारे शुल्क भरल्याचे दाखवून दस्तऐवज वैध असल्याचा आभास निर्माण करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. हा गुन्हा एक एप्रिल २०२५ ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
एकनाथ जांभूळकर, शैलेश ओव्हाळ, ऋषिकेश ओव्हाळ, गौतम सपकाळ, नासिर आराकटी यांना याप्रकरणी अटक झाली आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष जाधव अधिक तपास करत आहेत. दस्तऐवजांची पडताळणी, स्टॅम्प पेपरचा स्रोत, नोंदणी प्रक्रियेत झालेल्या कथित फेरफारांचा तपास तसेच संबंधित साक्षीदारांचे जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुस्तकांच्या दुकानातून ₹३,००० कोटींचे साम्राज्य! गलगोटियास विद्यापीठाची स्थापना कुणी आणि कशी केली? वाचा सुनील गलगोटियांची कहाणी

Washim Mass Copying Case : वाशिममधील सामूहिक कॉपी प्रकरणात गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून २७ जणांवर गुन्हे दाखल!

Mumbai News: अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेशी तडजोड नाही, आयएनएस शिक्राजवळील इमारतीचे काम थांबविण्याचे आदेश

T20 WC Super 8s Full Schedule : पाकिस्तानच्या विजयासह 'सुपर ८' संघ ठरले; जाणून घ्या टीम इंडियासह सर्व संघांचे वेळापत्रक

Navi Mumbai: क्षुल्लक कारण पण अमानुष शिक्षा! हातावर व्रण येईपर्यंत ४० फटके अन्...; टीचरचं विद्यार्थिनीसोबत विकृत कृत्य, काय घडलं?

SCROLL FOR NEXT