पिंपरी-चिंचवड

लोणावळा नगरपरिषदेला राज्यस्तरीय तृतीय क्रमांक

CD

लोणावळा, ता. १९ : राज्य सरकारच्या वतीने स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाच्या दिशेने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांसाठी ‘माझी वसुंधरा अभियानांतर्गत लोणावळा नगरपरिषदेला राज्यस्तरीय तृतीय क्रमांकाचा मान मिळाला आहे. या यशाबद्दल नगरपरिषदेला तीन कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले असून, शहरासाठी ही अभिमानास्पद बाब ठरली आहे.
शहरात घनकचरा व्यवस्थापन, घरगुती कचरा वर्गीकरण, प्लॅस्टिक बंदीबाबत जनजागृती, वृक्षारोपण, जलसंवर्धन, ऊर्जा बचत तसेच विविध स्वच्छता मोहिमा प्रभावीपणे राबविण्यात आल्या. प्रशासन व नागरिक यांच्या समन्वयातून या उपक्रमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आल्याने राज्यस्तरावर लोणावळ्याची दखल घेण्यात आली. नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, उपनगराध्यक्ष देविदास कडू, मुख्याधिकारी अशोक सावळे, आरोग्य समिती सभापती धनंजय काळोखे तसेच सर्व नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचारी यांनी या यशाबद्दल शहरवासीयांचे आभार मानले. स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, शैक्षणिक संस्था, व्यापारी संघटना आणि पर्यावरणप्रेमी नागरिक यांच्या सक्रिय सहभागामुळेच हा सन्मान प्राप्त झाल्याचे त्यांनी नमूद केले.
घरगुती कचरा वर्गीकरणात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग, शाळा-महाविद्यालयांतून राबविण्यात आलेले जनजागृती कार्यक्रम, तसेच प्लॅस्टिक कमी करण्यासाठी नगरपरिषदेने घेतलेला पुढाकार, यामुळे लोणावळा शहराने राज्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे. राज्यस्तरीय तृतीय क्रमांकामुळे संपूर्ण शहरात आनंदाचे वातावरण असून, भविष्यात प्रथम क्रमांक मिळविण्याचा निर्धार नगरपरिषद प्रशासनाने व्यक्त केला आहे. पर्यावरणपूरक व स्वच्छ लोणावळा घडविण्यासाठी नागरिकांचे सहकार्य पुढेही कायम राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT