पिंपरी-चिंचवड

चिखली - मोशी शिव रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होणार

CD

मोशी, ता. ९ : चिखली-मोशी, बोऱ्हाडेवाडी ते बोराटेनगर मार्गे देहू रस्त्याला जोडणाऱ्या शिव रस्त्याच्या कामामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळाला आहे. वाढत्या रहदारीमुळे निर्माण झालेल्या कोंडीला हा रस्ता पर्यायी मार्ग ठरणार असून स्थानिक नागरिकांत समाधानाची भावना व्यक्त होत आहे.
मोशी, चिखली परिसरातील वाढती लोकसंख्या आणि वाढत्या प्रकल्पांमुळे गेल्या काही महिन्यांपासून वाहतूक कोंडी, खड्डे, चिखल आदी ही गंभीर समस्या बनली होती. या पार्श्वभूमीवर बोऱ्हाडेवाडी- मोशी येथील वुड्सविले फेज-वन, कुमार प्रिन्सविले, स्वराज सोसायटी परिसरातून जाणाऱ्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले. या रस्त्यासाठी लागणारी जागा स्थानिक भूमिपुत्र बोराटे आणि बोऱ्हाडे कुटुंबांनी सामाजिक भावनेतून ही जागा उपलब्ध करून दिली, ही बाब उल्लेखनीय आहे. या कार्याला गती देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते निखिल बोऱ्हाडे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून महानगरपालिका प्रशासन आणि स्थानिक भूमिपुत्र यांच्यात संवाद साधून हा रस्ता वास्तवात आणला.
सामाजिक जाणीवेबद्दल नागरिकांनी आमदार महेश लांडगे, मधुकर बोराटे, संतोष बोराटे, सुनील बोराटे, सीताराम बोराटे या शेतकरी कुटुंबांसह बोऱ्हाडे कुटुंब तसेच सामाजिक कार्यकर्ते निखिल बोऱ्हाडे यांचे आभार मानले.

आमदार महेश लांडगे, स्थानिक भूमिपुत्र बोराटे आणि बोऱ्हाडे यांच्या सकारात्मक भूमिकेतून हा पर्यायी रस्ता साकारत आहे. त्याने चिखली - मोशी शिवरस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होणार असून परिसराच्या विकासात एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
- निखिल बोऱ्हाडे, सामाजिक कार्यकर्ते, बोऱ्हाडेवाडी
PNE25V58771

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chh. Sambhajinager: 'तू माझ्या नवऱ्याला इन्स्टाग्रामवर फॉलो का केलं' असं म्हणत तीन महिलांकडून एकीला बेदम मारहाण

Asian Aquatic Championship : तिरंग्याचा अपमान? जलतरणपटूंच्या पोशाखाबाबत केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं मागवला अहवाल, नेमकं काय घडलं?

Panchang 10 October 2025: आजच्या दिवशी गणेश कवच स्तोत्र पठण व ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा जप करावा

Railway Megablock: मध्य रेल्वेवर १९ तासांचा जम्बो ब्लॉक! लोकलसह अनेक गाड्या रद्द; वाचा सविस्तर

IND vs WI 2nd Test Live : आजपासून दुसरा कसोटी सामना; विंडीजकडून माफक लढतीची अपेक्षा, कशी असेल भारतीय संघाची प्लेईंग XI?

SCROLL FOR NEXT