पिंपरी-चिंचवड

मोशी प्राधिकरणात ध्वनी, वायूप्रदुषणाने नागरिक त्रस्त

CD

मोशी, ता. १४ : मोशी प्राधिकरणातील पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयामुळे (आरटीओ) पेठ क्रमांक ४, ६ परिसरात असलेल्या रहिवाशांना मोठ्या प्रमाणात वायू आणि ध्वनी प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. वाहनांचा धूर, आवाज व अस्वच्छतेमुळे लहान मुलांना व ज्येष्ठांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला आहे.
आरटीओ कार्यालयात दररोज शेकडो हलकी-जड वाहने विविध कामांसाठी येतात. त्यामध्ये १० व १६ टायरच्या हायवा, डंपर, ट्रक, बस अशा जड वाहनांसह मोटारी, जीप, पिकअप, प्रवासी व मालवाहतूक रिक्षांचा समावेश आहे. या वाहनांची ब्रेक चाचणीही याच परिसरात केली जाते.
ब्रेक चाचणीसाठी आलेली वाहने पेठ क्रमांक ६ मधील जलवायू विहार, साईकृपा, गायत्री कुंज या गृहनिर्माण संस्थांसमोर थांबवली उभी केली जातात, तर अन्य काही कामांसाठी आलेली वाहने स्नेहदीप, वेदांत होम्स, व्यंकटेश्वरा, किंग्स इव्हिनो, कृतिका रेसिडेन्सी, श्रीरंगदास स्वामी, श्री पॅराडाईज अशा विविध गृहनिर्माण संस्थांच्या प्रवेशद्वारासमोर, रस्त्यावर आणि परिसरातही तास न् ‌तास उभी केली जातात. अनेक चालक इंजिन बंद न करता वाहने सुरूच ठेवत असल्याने मोठा आवाज व धुराचे लोट थेट सोसायट्यांतील सदनिकांमध्ये शिरतात. परिसरात शाळाही असल्याने विद्यार्थ्यांनाही या ध्वनी व हवेच्या प्रदूषणाचा फटका बसत आहे. आपण चालायचे कोठून ? असा प्रश्न देखील पादचाऱ्यांना पडत आहे. त्यातच महिला, विद्यार्थिनी यांची चालताना मोठ्या प्रमाणावर कुचंबणा होत आहे.

आम्ही लाखो रुपये खर्चून शांत, स्वच्छ वातावरण, नियोजनबद्ध परिसरात घर घेतले. पण आता दिवसभर वाहनांचा आवाज व धूर सहन करावा लागतो. लहान मुलांना व ज्येष्ठांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला आहे.
- सचिन पाटील, रहिवासी

सकाळपासून संध्याकाळपर्यंत रस्त्यावर वाहने उभी असतात. काहीजण रस्त्यावर गुटखा थुंकतात. रेडियमच्या पाट्यांचा कचरा टाकतात. हा परिसर निवासी आहे की पार्किंगचा, असा प्रश्न पडतो.
- कविता देशमुख, नागरिक

फलक लावण्याची मागणी
निवासी इमारतींसमोर वाहने लावू नयेत या आशयाचे फलक आरटीओ कार्यालयाने लावून काही कर्मचाऱ्यांची नेमणूक केल्यास काही प्रमाणात ही समस्या दूर होईल. या प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.


मोशीतील स्वयंचलित चाचणी केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे ते सुरू झाले नाही. वाहन पासिंगसाठी दुसरीकडे जागा उपलब्ध नाही. त्यामुळे मोशीतील केंद्र सुरू होईपर्यंत सध्या सुरू असलेल्या ठिकाणीच वाहनांची पासिंग करावी लागेल.
- राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

MOS26B04123

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhule Municipal Election 2026 : राजकीय वातावरण तापलं! धुळ्यात शिंदे गटाच्या उमेदवाराच्या घरावर दगडफेक, खुर्च्यांची केली तोडफोड; भाजपने हल्ला केल्याचा आरोप

Mumbai Politics: विरोधकांची मराठी बाबतची भूमिका ही नकारात्मकतेने भरलेली; भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल, काय म्हणाले?

PF Withdrawal via BHIM App: लवकरच ‘BHIM’ अ‍ॅप द्वारेही ‘PF’ काढता येणार!, जाणून घ्या ‘ही’ सुविधा कधी उपलब्ध होणार?

Nagpur Crime : "मुलगी आईकडे देणार नाही"; नागपुरात रागाच्या भरात बापाने चिमुकल्या मुलीचा घेतला जीव!

Pune Holkar Bridge : होळकर पुलावर पहाटेच्या सुमारास भीषण अपघात; धडक देऊन चालक पसार!

SCROLL FOR NEXT