पिंपरी-चिंचवड

मोशीतील वाहतूक दिवसेंदिवस गंभीर, नियम ‘चाकाखाली’

CD

मोशी, ता.१४ : पुणे-नाशिक महामार्ग सध्या अपघात आणि वाहतूक कोंडीचे केंद्र बनला आहे. मोशीतील जुन्या मोशी-आळंदी आणि भारत माता चौकात प्रवासी रिक्षा, अवजड वाहनांसह दुचाकी, चारचाकी चालक मोठ्या प्रमाणावर उलट दिशेने वाहने चालवत असल्याने परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. कोंडीबरोबरच अपघाताचीही टांगती तलवार वाहनचालकांच्या डोक्यावर राहत आहे. शिस्तप्रिय वाहनचालक, पादचारी तसेच स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
मोशीतील पुणे-नाशिक महामार्गावरील जुन्या मोशी-आळंदी चौकात वाहनचालकांकडून मोठ्या प्रमाणावर वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. या ठिकाणी ट्रॅफिक वॉर्डन आणि पोलिसांची उपस्थिती असली तरी उलट दिशेने वाहन चालवणाऱ्यांवर ठोस कारवाई होत नाही. काही वेळा पोलिस आणि वॉर्डन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई न झाल्याने अशा चालकांचे मनोबल वाढत असून परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे.
वाहतूक कोंडीमुळे वेळेचे नुकसान, इंधनाचा अपव्यय आणि मानसिक तणाव वाढत आहे. अपघाताचा धोका कायम राहिल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक वाहनचालक आणि रहिवाशांनी प्रशासनाकडे तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

नियम धाब्यावर...
- बेशिस्त वाहनचालकांची बेलगाम शर्यत
- एकमेकांवर वाहने आदळण्याचे प्रकार
- किरकोळ अपघातांच्या प्रमाणात वाढ
- कार्यालयीन वेळेत समस्या अधिक तीव्र
- रुग्णवाहिका, शालेय बस, अत्यावश्यक सेवांची वाहनेही कोंडीत

मागण्या काय ?
- वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी
- सीसीटीव्हीद्वारे दंडात्मक कारवाई करावी
- कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणूक
- दिशादर्शक फलक लावण्याची आवश्यकता

पूर्व बनकर वस्तीवरील रस्ता दुभाजकांमधून वळण घेत अग्निशामक दल, मोशी सरकारी दवाखाना या बाजूने विरुद्ध दिशेने प्रवासी रिक्षा, दुचाकीस्वार, स्थानिक वाहनचालक हे वाहने चालवत मुख्य चौकात येतात. त्यामुळे मोशी - आळंदीकडे जाणाऱ्या पुणे - नाशिक महामार्गावरील मुख्य चौकात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक पोलिसांनी उपाययोजना करणे तसेच नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे.
- रवी बोऱ्हाडे, स्थानिक नागरिक

देवदेवस्थान ट्रस्टचे आवाहन
ग्रामदैवत श्री नागेश्वर महाराज भंडारा उत्सवानिमित्त सोमवार (ता.१६) पासून तीन दिवस येथे प्रचंड वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. ती होऊ नये म्हणून अगोदरपासूनच उपाययोजना करण्याची व विरुद्ध दिशेने वाहने न आणून वाहनचालकांनी सहकार्य करण्याची मागणी देवदेवस्थान ट्रस्टच्यावतीने करण्यात आली आहे.

पूर्व बनकर वस्ती, अग्निशामक दल, मोशी सरकारी दवाखाना येथे बॅरिकेड्स लावण्यात येतील. यात्रा कालावधीसह या बाजूने मुख्य चौकात विरुद्ध दिशेने येणाऱ्या प्रवासी रिक्षा, दुचाकी स्वार, स्थानिक वाहनचालक वाहनांवर कायमस्वरुपी कडक कारवाई करण्यात येणार आहे.
- गंगाधर घाडगे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Fire : मुंबईत पहाटे भीषण दुर्घटना! डोंबिवलीत भीषण आग; २९ दुचाक्या खाक, ५ जण जखमी

री-रिलीजपूर्वी सलमान खानची जुनी मुलाखत व्हायरल; ‘तेरे नाम’च्या यशामागचं रहस्य उघड

Tiger Attack: कोलारमेट शिवारात दुचाकीस्वारावर वाघिणीचा हल्ला; गावकरी दहशतीत, वाघाचे दर्शन होणे नित्याचेच

Latest Marathi News Live Update : भारताच्या विजयासाठी कानपूरमधील मंदिरात प्रार्थना

IND vs PAK: भारताविरुद्धचा सामना चांगल्या वातावरणात व्हावा : सलमान आघा

SCROLL FOR NEXT