पिंपरी-चिंचवड

पावसामुळे उन्हाळी फळांचे नुकसान

CD

रावेत, ता. २३ : उन्हाळा सुरू होताच शहरातील बाजारपेठा टरबूज, खरबूज, आंबे आणि ताडगोळ्यांसारख्या पाणीदार फळांनी फुलून गेल्या होत्या. चौकाचौकांत फळ विक्रेत्यांनी आकर्षक मांडणी करून ग्राहकांचे लक्ष वेधले होते. मात्र, गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विक्रेत्यांच्या आशांवर पाणी फिरले आहे. पावसाचे पाणी दुकानांमध्ये शिरल्याने टरबूज, खरबूज, आंबा, जांभूळ, करवंदे आदी फळे सडू लागली असून विक्रेत्यांना ती फेकावी लागत आहेत. परिणामी, मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे, अशी खंत फळ विक्रेत्यांनी व्यक्त केली.
उन्हाळ्यात टरबूज १५-३० रुपये प्रतिकिलो, खरबूज ३० रुपये प्रतिकिलो, नारळ पाणीदार २५ रुपये, रत्नागिरी आणि देवगड हापूस आंबा ४०० ते ९०० रुपये प्रतिडझन, ताडगोळे, शहाळे यांना यंदा १८० रुपये प्रतिडझन या दराने शहरात विक्री होत होती, मात्र आता प्रत्येक २०- ५० रुपये तोटा सहन करून विक्री करावी लागत आहे.
यंदा उन्हाळा अधिक उष्ण जाणवेल, अशी अपेक्षा होती, मात्र अचानक बदललेल्या वातावरणामुळे आणि अचानक झालेल्या पावसामुळे ग्राहकांची फळांची मागणी घटली आहे. आंबा विक्रीला विशेषत: फटका बसत असल्याची भावना विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.
शहरात अनेक भागांतून टरबूज आणि खरबूजची आवक होत आहे. पालघर, कोकण, आंध्रप्रदेश, हैदराबाद, गुजरात, कर्नाटक येथून विविध जातींचे आंब्यांची आवक झाली होती. या फळांमध्ये भरपूर पाणी, खनिजे, लोह, फॉस्फरस व ‘ए’, ‘बी’, ‘सी’ जीवनसत्त्वे असल्याने आरोग्यास फायदेशीर मानली जातात. मात्र, हवामान बदलामुळे यंदा ही पोषकतत्त्वे ग्राहकांपर्यंत पोहोचण्याआधीच नष्ट होण्याच्या स्थितीत आहेत.

‘‘पावसामुळे टरबूज, खरबूज, आंबे, जांभूळ आणि करवंदे यांचे नुकसान होत आहे. वातावरणात अधिक ओलावा असल्यामुळे फळे सडत आहेत. परिणामी, आर्थिक नुकसान होत आहे.
- सचिन भोई, विक्रेता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest Crime Data : जंतर-मंतरवरील आंदोलनात घुसले गुन्हेगारी पार्श्वभूमीचे १००० लोक; AI ने ओळखले चेहरे, पोलीसही चकित

हार्दिक पांड्यासाठी फक्त CSK नाही, तर 'हा' संघही करतोय प्रयत्न! थेट कर्णधारालाच Mumbai Indians सोबत ट्रेड करण्याची चर्चा

Latest Live Updates Marathi : उजनी धरण १०० टक्के भरले, भीमा नदीत ६१,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना इशारा

Paris Knife Attack: पॅरिस हादरलं! गर्भवती महिलेसह तिघींवर चाकूहल्ला; आरोपीचा धक्कादायक दावा, म्हटला "मला अल्लाहने पाठवलं"

PM Modi Video Meta Apology : गलतीसे मिस्टेक! PM मोदींचा व्हिडिओ भारतात ब्लॉक, मेटाने चूक कबूल करत मागितली माफी

SCROLL FOR NEXT