पिंपरी-चिंचवड

जलवाहिनीचे काम; वाहतूक कोंडी जाम

CD

रावेत, ता.२७ ः रावेत आणि आकुर्डी परिसरातील प्रभाग २१ आकुर्डी, निगडी प्राधिकरण, आकुर्डी गावठाण आणि प्रभाग २३ मधील पंपिंग स्टेशन चौक, रावेत चौक ते मुकाई चौक येथे सुरू असलेल्या जलवाहिनीच्या कामामुळे रस्ते उखडले आहेत. बीआरटीमधील खोदकामामुळे अनेक ठिकाणी मातीचे ढिगारे उभे असून पावसामुळे माती रस्त्यावर वाहून आल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच काही ठिकाणी खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे अपघात होण्याचे प्रमाणही वाढले आहे.
निगडी प्राधिकरणमधील पवळे उड्डाणपुला शेजारी मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे पर्यायी मार्गावर ही मोठे खड्डे पडले आहेत. परिणामी, खड्ड्यांमधून मार्ग काढताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी काही ठिकाणी वळण मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. मात्र, पावसामुळे रस्त्यांची स्थिती आणखी बिकट होत असल्याने रस्ते दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेणे आवश्यक आहे. जलवाहिनीच्या कामास नागरिकांचा होकार दिला असला तरी सुरक्षित आणि सुरळीत वाहतुकीसाठी रस्त्यांची जलद दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरत आहे.
स्थानिक रहिवासी संजय देशमुख म्हणाले, ‘‘आम्ही सकाळी कामावर जाण्यासाठी अर्धा तास लवकर निघतो. पण, रस्त्यांची अवस्था इतकी वाईट आहे की, वेळेवर पोहोचणे कठीण झाले आहे. महापालिकेने काम पूर्ण करून रस्ते लवकर दुरुस्त करावेत.’’
प्रवासी कविता शिंदे म्हणाल्या, ‘‘रस्त्याच्या खोदकामामुळे अनेक ठिकाणी माती रस्त्यावर आली आहे. त्यातून दुचाकीवरून प्रवास करताना अनेक अडचणी येत आहे.’’

पाणीपुरवठा सुधारण्यासाठी जलवाहिनीचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे. नागरिकांच्या गैरसोयीची आम्हाला जाणीव आहे. काम लवकर पूर्ण करून रस्ते पूर्ववत करण्यात येतील. या भागांतील ९० टक्के काम झाले आहे. प्राधिकरणातील मारूती मंदिरापर्यंत काम झाले आहे. लवकरच उर्वरित काम केले जाईल.
- प्रवीण धुमाळ, उपअभियंता, स्थापत्य विभाग, ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय
NGI25B00433

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dubai Airport Drone Attack : दुबई विमानतळावर इराणचा ड्रोन हल्ला ! आकाशात धुराचे लोट, विमानसेवा विस्कळीत

Sambhajinagar Hostel Mess 'Mess': CIPET वसतिगृहात धक्कादायक प्रकार: विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या-मुंगळे; महिनाभरात दहा वेळा घटना

Sambhajinagar News: शहीद सैनिकांच्या मुलांसाठी आनंदाची बातमी: MGM विद्यापीठात 100% मोफत शिक्षणासाठी भारतीय सैन्यदलासोबत करार

Sambhajinagar LPG News: गॅस तुटवड्यावर ‘सकाळ’चा दणका: बुढीलेनमध्ये हॉटेलवर छापा, घरगुती तीन सिलिंडर जप्त

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना एप्रिलमध्ये मिळणार ३००० रुपये; ‘ई-केवायसी’साठी ३१ मार्चपर्यंत मुदत, पडताळणीचा अहवाल शासनाला सादर, वाचा...

SCROLL FOR NEXT