रावेत, ता. ७ : रावेत पंपिंग स्टेशन चौकातील वाहतूक नियंत्रक दिव्यांसमोर झाडाच्या वाढलेल्या फांद्या आल्यामुळे दिवे पूर्णपणे झाकले गेले आहेत. वाहनचालकांना दिवे दिसत नसल्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन होण्याची शक्यता वाढली आहे. परिणामी, अपघाताची शक्यता देखील निर्माण झाली असून वाहतूक सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
रावेत पंपिंग स्टेशन चौकात वाहतूक नियंत्रक दिव्यांवरील फांद्यांची तातडीने छाटणी होणे अत्यावश्यक आहे. नागरिकांनी वेळोवेळी हा मुद्दा अधोरेखित केला आहे. वाहतूक सुरक्षेवर गदा येत आहे. लवकरात लवकर योग्य पावले उचलल्यास मोठ्या दुर्घटनांना अटकाव करता येईल, अशी अपेक्षा वाहनचालक व्यक्त करत आहेत.
वाहनचालक रमेश वाघमारे म्हणाले, दिवे अगदी शेवटच्या क्षणी दिसतो. त्यामुळे वाहने थांबवावे की नाही, हे समजत नाही. त्यामुळे वाहने एकमेकांवर धडकणे, अचानक ब्रेक लागणे अशा घटना वारंवार घडत आहेत.’’
स्थानिक रहिवासी जयश्री काळघे म्हणाल्या, ‘‘या चौकातून शाळेची वाहने, दुचाकी आणि मोठ्या प्रमाणात अवजड वाहने जातात. दिवे दिसत नसल्याने शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्नही उभा राहतो आहे.’’
महापालिकेच्या दळणवळण विभागाचे अधिकारी बापू गायकवाड म्हणाले, ‘‘वाहतूक नियंत्रक दिव्यांसाठी अडथळा ठरणाऱ्या फांद्यांची त्वरित छाटणी केली जात आहे. तसे निर्देश उद्यान विभागाला दिले आहेत.’’
NGI25B00609
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.