पिंपरी-चिंचवड

स्वच्छता असे जेथे; निरोगी आरोग्य वसे तेथे

CD

निगडी, ता. १२ ः पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने आकुर्डीतील शितळादेवी मंदिर ते खंडोबा मंदिर परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमाला स्थानिक नागरिक, महिला बचतगट, शाळकरी मुले आणि महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत स्वच्छतेबाबत जनजागृती घडवून आणली.
महानगरपालिकेचा आरोग्य विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले. सकाळी आठ वाजता मोहिमेची सुरुवात झाली. परिसरातील मुख्य रस्ते, गल्लीबोळ, सार्वजनिक ठिकाणे, मंदिर, बाजारपेठ या सर्व भागांत सफाई कामगारांनी व स्वयंसेवकांनी कचरा उचलणे, भिंतीवर लावलेले फलक काढणे, सार्वजनिक स्वच्छतागृहांची सफाई, झाडांचा पालापाचोळा उचलणे यासारखी कामे केली.
या मोहिमेत विशेषतः महिला मंडळे, तरुण मंडळे आणि स्थानिक रहिवाशांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. काही शाळांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनजागृती फेरी काढून ‘स्वच्छ गाव, सुंदर गाव’ अशा घोषणा दिल्या. मोहिमेदरम्यान अनेकांनी आपल्या परिसरातील स्वच्छता ही सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले.

आकुर्डीतील शितळादेवी मंदिर, तुळजाभवानी मंदिर आणि खंडोबा मंदिर परिसरातील स्वच्छता सुधारण्याच्या उद्देशाने ही मोहीम हाती घेण्यात आली. नागरिकांच्या चांगल्या प्रतिसादामुळे यशस्वी अंमलबजावणी शक्य झाली. महापालिकेचे आरोग्य कर्मचारी रोज नित्याने स्वच्छता करत असतात. आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. सगळ्यांनी मिळून आपला परिसर स्वच्छ ठेवू या.
- विकास शिंदे, आरोग्य निरीक्षक, ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय

महापालिकेने छान उपक्रम राबवला आहे. आम्ही नेहमी परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सजग असतो; पण आज सर्वांनी मिळून काम केल्याने फार आनंद झाला.
- मनीषा शिंदे, स्थानिक रहिवासी

‘‘फक्त आजच नाही; तर रोजच आपण आपल्या परिसराची स्वच्छता राखली पाहिजे. हे अभियान नियमित राबविले जाते. प्रभागातील संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवण्याची आमची जबाबदारी आम्ही पार पाडत आहोत.
- ओम प्रकाश सावदा, आरोग्य मुकादम

NGI25B00632

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Social Media Ban : नेपाळमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदीचं नवीन कारण आलं समोर, कोणते अ‍ॅप सुरू अन् कोणते बंद?

घरच्यांच्या विरोधात जाऊन गायिकेने केलेलं 20 वर्षं मोठ्या व्यक्तीबरोबर लग्न; घरगुती हिंसेची शिकार आणि बहिणींमधील भांडण

Asia Cup Live Streaming: आशिया कप जिओ हॉटस्टारवर नाही दिसणार; मग IND vs PAK मॅच कुठे पाहता येणार?

न्यायालयाला राजकारणाचा आखाडा बनवू नका, नेता असाल तर कातडी जाड हवी; सुप्रीम कोर्टानं भाजपलाच झापलं

Asia Cup 2025 : संजू सॅमसनला टॉप ऑर्डरवर खेळवा, शुभमन गिलसाठी दुसरी जागा शोधा...; Ravi Shastri यांचा गौतम गंभीरला सल्ला

SCROLL FOR NEXT