निगडी, ता. ३ : तळवडेतील त्रिवेणीनगर आणि परिसरातील अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे. शिवाय, गटाराचे पाणी रस्त्यावर वाहत असल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. खड्डेमय रस्ते आणि दुर्गंधीमुळे पादचाऱ्यांसह वाहनचालकांना रोजचा प्रवास करणे आव्हानात्मक झाले आहे.
ताम्हणेवस्ती, शिवरकर चौक, मोरे वस्ती आणि टॉवर लाइन या दाट लोकवस्तीच्या भागांत ही समस्या गंभीर झाली आहे. येथे उंच इमारती, सोसायट्या आणि दुकाने असल्याने वर्दळ सतत असते. मात्र, खड्डे चुकवताना वाहनचालकांची मोठी कसरत होते.
मोठे खड्डे आणि रस्त्यांवर साचलेले सांडपाणी, कालबाह्य सांडपाणी वाहिन्या वारंवार फुटल्याने दुर्गंधी पसरत आहे.
अनेक वर्षे तक्रारी करूनही महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. ‘‘येथील जुन्या सांडपाणी वाहिन्या बदलून मोठ्या वाहिन्या टाकाव्यात आणि रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी,’’ अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
‘‘त्रिवेणीनगरमधील सांडपाणी वाहिन्या जुन्या झाल्याने त्या वारंवार फुटतात. महापालिकेकडून नागरी सुविधा पुरवताना टाळाटाळ केली जात आहे. प्रशासनाने तातडीने मोठ्या वाहिन्या टाकून अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करावी,’’ अशी मागणी स्थानिक नागरिक मनीष भालेकर यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.