पिंपरी-चिंचवड

वेळा निश्चित करुन योग्य दाबाने पाणी हवे

CD

निगडी ः ऐन उन्हाळ्यात कमी दाबाने, अनियमित वेळेत पाणीपुरवठा होत असल्यामुळे हाल होत आहे. त्यामुळे वेळा निश्चित करुन योग्य दाबाने पाणीपुरवठा करावा अशा मागण्या नागरिकांनी केल्या.
महापालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयात आयोजित बैठकीमध्ये नागरिकांनी वरील मागण्या केल्या. यावेळी नगरसेवक संगीता ताम्हाणे, यश साने, नीलेश नेवाळे, उत्तम केंदळे, शिवानी नरळे यांच्यासह रुपीनगर, तळवडे, निगडी आदी भागांतील नागरिक उपस्थित होते.
शुद्ध व योग्य दाबाने पाणीपुरवठा करा. पाणीपुरवठ्याची नियमित वेळ निश्चित करा. सामान्य नागरिकांनी फोन केल्यानंतर अधिकारी प्रतिसाद देत नाहीत. त्यांच्यावर त्वरीत कारवाई करावी, अशा मागण्या नगरसेवक आणि नागरिकांनी यावेळी केल्या.

टँकरचा भुर्दंड नागरिकांना नको. त्यासाठी त्वरीत योग्य त्या उपाययोजना कराव्यात.
- संजीवन सांगळे, अध्यक्ष, सोसायटी फेडरेशन

यमुनानगर भागामध्ये अनियमित पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यामध्ये नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. तरी त्वरीत पाणीपुरवठा सुधारावा.
- शुभांगी काळवीट, नागरिक

या भागात झपाट्याने लोकवस्ती वाढत आहे. परंतु मागील चार वर्षा एवढाच पाणीपुरवठा आहे. त्यामुळे तात्पुरत्या उपाय योजना करून काही दिलासा देण्यासाठी प्रयत्न आहे. कायमस्वरूपी ही समस्या सोडविण्यासाठी भामा आसखेड योजनेचे पाणी एक वर्षभरामध्ये पोहोचविण्याचे नियोजन आहे.
- विजयसिंह भोसले, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं आणखी स्वस्त! सलग 10 व्या दिवशी दर घसरले; उच्चांकापासून 29,000 रुपयांनी स्वस्त, आज महाराष्ट्रात किती भाव?

Ajanta Ghat Road : पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! अजिंठा लेणी परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार; भूसंपादनासाठी राजपत्र होणार प्रसिद्ध, नव्या रस्त्याचा काय आहे प्लॅन?

Latest Marathi News Live Update : ठाणे मनपाच्या चौथ्या मजल्यावर आग, महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक

Jalgaon News : देवदर्शनाहून परतताना अपघात, क्रूझरमधील नाशिकच्या २ महिलांचा मृत्यू, १० जण गंभीर जखमी

Solapur Banana: केळी उत्पादक शेतकऱ्यांचे ८०० कोटींचे नुकसान; पंढरपूर तालुक्यातील सुमारे ९०० एकरावरील केळीच्या बागा भुईसपाट

SCROLL FOR NEXT