पिंपरी-चिंचवड

गुन्हे वृत्त

CD

आई-वडीलांना मासिक निर्वाह
भत्ता न देणाऱ्या मुलावर गुन्हा
पिंपरी, ता. १५ : ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरणाने दिलेल्या आदेशाचे पालन न करता आई-वडीलांना मासिक निर्वाह भत्ता दिला नाही. तसेच, घराच्या भिंतीवर काळ्या रंगाने काहीही लिहून विद्रूपीकरण करून मानसिक छळ केला. याप्रकरणी मुलावर चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राजेश वसंत जामदार (वय ४२, रा. सिंहगड रोड, धायरी) असे गुन्हा दाखल केलेल्या मुलाचे नाव आहे. त्याच्यावर ज्येष्ठ नागरिक व पालक यांचे पालन पोषण व कल्याण कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी वृद्ध आईने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राजेश हा आई-वडीलांना सांभाळत नसल्याने आई-वडिलांनी ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरणाकडे तक्रार दिली होती. निर्वाह न्यायाधिकरण न्यायालयाने तक्रारदार आई-वडीलांना मासिक निर्वाह भत्ता देण्याचे आदेश मुलगा राजेश याला दिले होते. मात्र, राजेशने न्यायालयाने ठरवून दिलेला निर्वाह भत्ता आई-वडीलांना दिला नाही. तसेच, घराच्या भिंतीवर काळ्या रंगाने काहीही लिहून भिंतीचे विद्रूपीकरण करून मानसिक छळ केला.

बांगलादेशी तरुणाला अटक
पासपोर्ट, व्हिसाची मुदत संपलेली असतानाही बेकायदारित्या भारतात वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी तरुणाला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई जुनी सांगवी येथे करण्यात आली. कालीपाडा विनोदचंद्र सरकार (वय ३५, रा. मधुबन कॉलनी क्रमांक तीन, जुनी सांगवी, मूळ- बांगलादेश) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. कालीपाडा हा मूळचा बांगलादेशचा आहे. त्याच्या पासपोर्ट व व्हिसाची मुदत संपलेली असतानाही त्याने येथे वास्तव्य केल्याचे समोर आले. त्याने भारतातील नागरिकांना देय असलेले आधारकार्ड, मतदान कार्ड, पॅनकार्ड यांच्या छायांकित प्रती अवैधरीत्या प्राप्त केल्याचे निदर्शनास आले.

महापालिकेच्या व्यायाम शाळेचे साहित्य चोरीला
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या व्यायाम शाळेचे साहित्य चोरीला गेल्याची घटना पिंपरीतील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे घडली. संदीप सदाशिव विनोद (रा.मासुळकर कॉलनी, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. महापालिकेचे क प्रभागमधील व्यायाम शाळेचे जुने व नादुरुस्त साहित्य २०१६ मध्ये नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियममधील मुलांच्या होस्टेलमध्ये ठेवले होते. दरम्यान, चोरट्याने होस्टेलच्या गेटचे कुलूप तोडून ५८ हजार रुपये किमतीचे व्यायाम शाळेचे साहित्य चोरले.

सॉफ्टवेअर इंजिनिअरकडून पत्नीचा छळ
सुरूवातीला लग्नास नकार दिल्याच्या रागातून सॉफ्टवेअर इंजिनिअरने पत्नीचा छळ केला. हा प्रकार हिंजवडी आयटी पार्क, चेन्नई तसेच अमेरिका येथे घडला. पती थंगराजा, महिला आरोपी, सासरा रामकृष्णन, दिर रविचंद्रन व राजा रामकृष्णन यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. विवाहितेने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी थंगराजा हा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. थंगराजाने सुरूवातीला लग्नाची मागणी केली असता विवाहितेने त्याला नकार दिला होता. त्यानंतर काही दिवसांनी विवाहितेने त्याच्याशी लग्नाला होकार दिला. त्यांनी लग्न केले. मात्र, विवाहितेने सुरूवातीला लग्नासाठी नकार दिल्याचा थंगराजाला राग होता. दरम्यान, थंगराजाने विवाहितेला तुझा छळ करण्यासाठी व तुझ्याकडून बदला घ्यायचा आहे, म्हणून तुझ्याशी लग्न केले, असे म्हणत शिवीगाळ व मारहाण सुरू केली. तसेच, रीती, भाषा येत नाही, म्हणत थंगराजच्या घरच्यांनीही सतत टोमणे देणे, अपमानित करणे, घरातून बाहेर काढत विवाहितेचा छळ केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan Firing: त्याने स्वतःला संपवलं नाही..अनुज थापरची हत्या? कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Heeramandi: हिरामंडी पाहिल्यानंतर 'या' कारणामुळे भडकला अभिनेता; म्हणाला, "इतका अन्याय का? निराशाजनक! "

SRH vs RR : आज पडणार धावांचा पाऊस! जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या राजस्थान रॉयल्सशी हैदराबादचा सामना

Latest Marathi News Live Update : अंधेरी पंप परिसरात मोठी आग, दारू दुकान जळून खाक

SCROLL FOR NEXT