पिंपरी-चिंचवड

सावित्रीबाई फुले उद्यानात टाकाऊ पासून टिकाऊचा संदेश

CD

जुनी सांगवी, ता. २० ः कमी कचरा, वस्तूचा पुनर्वापर, टाकाऊ पासून नवीन वस्तू तयार करणे या त्रिसूत्रीवर आधारित टाकाऊ वस्तूंच्या कल्पकतेने वापर करून महापालिकेच्या वतीने पिंपळे निलख येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले उद्यानात साकारण्यात आलेले ‘वेस्ट टू वंडर’ मॉडेल हे नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन आणि पर्यावरणाच्या दृष्टीने पूरक संदेश देणारे आकर्षक उद्यान आहे.
या उद्यानात दैनंदिन जीवनात वापरात येत असलेल्या पुनर्वापरायोग्य वस्तूंचा पुनर्वापर करण्याचा संदेश देण्यात आला आहे. येथे प्लास्टिक बाटल्या डिस्ट्रॉय करण्याची मशिन बसविण्यात आलेली आहे. त्यामुळे नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन होण्यास मदत होत आहे. टाकाऊ वस्तूंचा आकर्षक पद्धतीने पुनर्वापर करून सजावट करण्यात आली आहे.

उद्यानातील वैशिष्ट्ये...
- ‘वेस्ट टू वंडर’ मॉडेलमध्ये टाकाऊ फायबर रेनफोर्स्ट प्लास्टिक (एफआरपी) पासून ‘सेव ट्री, सेव लाइफ’ स्मारक
- दोन्ही मानवी तळहातावर नैसर्गिक फुलांच्या व शोभेच्या रोपांची लागवड
- आकर्षक व हरित स्वागत कमान
- स्वागत कमानीच्या दोन्ही उभ्या खांबांवर व्हर्टिकल गार्डन त्यामध्ये ‘वेस्ट टू वंडर’ हे नाव इंग्रजी अक्षरात

उद्यानाबाबत...
- टाकाऊ जुन्या विद्युत खांबापासून शोभेच्या ‘तोफ’
- जुन्या जीन्स पॅन्टपासून योगासनाचे विविध प्रकार दर्शविणारा अर्धाकृती मानव
- टाकाऊ खेळण्यांचा वापर करून आकर्षक ‘ट्रॉफी’
- जुन्या टायरचा वापर करून हुबेहूब घड्याळाची प्रतिकृती
- जुने विद्युत खांब, प्लास्टिक आणि बहुरंगी फुलांचा वापर करून उड्डाण भरणारे फुलपाखरू
- जुन्या लाकडांचा वापर करून आकर्षक बैलगाडी तर लाकडाच्या ओंडक्यापासून प्रतीकात्मक रेल्वे
- लाकडांचा वापर करून मानवी चेहऱ्यावरील विविध भाव दर्शविणाऱ्या विदूषकाच्या प्रतिकृती
- जुन्या तेलाच्या टाक्यांचा वापर करून ‘हॅप्पी मॅन’चे पुतळे
- जुने टायर, विद्युत खांब, आणि बांबू वापरून ‘रणगाडा’
- टायरपासून बनविलेल्या बुलेट दुचाकी
- विविध प्रकारचे मोठे वृक्ष, औषधी गुणधर्म असलेले अनेक वृक्ष, विस्तीर्ण लॉन
- मुलांना खेळण्यासाठी विविध खेळणी, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा

उद्यानाचे क्षेत्रफळ ः क्षेत्रफळ ३४ हजार चौ.मी. इतके आहे.
उद्यानाची वेळ ः सकाळी ६ ते १० रात्री - सायंकाळी ४ ते ८
तिकीट ः लहान मुले १० व मोठे २० रु.

कसे जाल ः
पुण्याहून रक्षक चौक जगताप डेअरी मार्गे,
वाकडहून वाकड रस्ता, विशालनगर मार्गे.
पुण्याहून बाणेर, बालेवाडीमार्गे पिंपळे निलख गावठाण रक्षक चौक मार्गे.

‘‘उद्यानाचा परिसर मोठा आहे. महापालिकेने उद्यानाची निगा व्यवस्थित राखली आहे. या उद्यानामुळे पिंपळे निलखच्या सौंदर्यात भर पडली आहे. पंचक्रोशीतील नागरिक येथील कलाकृती पाहायला
येतात.’’
- मनोज अगरवाल, नागरिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

iPhone Alarm issue : जगभरातील लोकांना आज उठायला झाला उशीर.. आयफोनचे अलार्म वाजलेत नाहीत! काय आहे कारण?

Rinku Singh : संघ निवडीबाबत मोठा खुलासा! BCCI च्या 'या' नियमामुळे रिंकूचे वर्ल्ड कप खेळण्याचे मिळाले स्वप्न धुळीस?

Traffic Noise: गाड्यांच्या आवाजामुळे वाढू शकतो हृदयविकार, डायबेटिस आणि स्ट्रोकचा धोका; धक्कादायक संशोधन समोर

Latest Marathi News Live Update: विदर्भ राज्य पार्टीच्या वतीने आज महाराष्ट्र दिवस हा काळा दिवस म्हणून पाळला जात आहे

SCROLL FOR NEXT