पिंपरी-चिंचवड

पिंपरी वर्धापनदिन पुणे मेट्रो लेख

CD

प्रवाशांच्या पसंतीची पुणे मेट्रो

पुणे व पिंपरी-चिंचवड शहराला जोडणारी वेगवान वाहतूक म्हणून अवघ्या काही महिन्यांतच मेट्रो नावारूपास आलेली आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते सिव्हिल कोर्ट व गरवारे ते रूबी हॉल या दोन मार्गिकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. अल्पावधीतच मेट्रो पिंपरी-चिंचवडकरांच्या पसंतीस उतरली.
- अतुल गाडगीळ, संचालक, कार्य, पुणे मेट्रो

पुणे व पिंपरी-चिंचवडमधील वाढती लोकसंख्या पाहता पीएमपीला दुसरी पर्यायी वाहतूक व्यवस्था निर्माण करणे ही गरज बनली होती. त्या अनुषंगाने पुणे महापालिकेने २००६ मध्ये वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गिकेसाठीचा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला. या मेट्रो प्रकल्पासाठी स्थायी समितीने दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनची नियुक्ती केली होती. २००९ मध्ये दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने मेट्रो प्रकल्पाचा अहवाल महापालिकेला सादर केला. २०१० मध्ये या अहवालाला पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. २०१२ मध्ये पुणे महापालिकेने हा मेट्रोचा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवला. याच वर्षी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गाला मंजुरी दिली. २०१३ मध्ये प्रकल्पाची वाढलेली किंमत लक्षात घेऊन सुधारित अहवाल पाठविण्याचे आदेश पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेला देण्यात आले. त्यानुसार दोन्ही महापालिकांकडून सुधारित अहवाल पाठविण्यात आले.
२०१६ मध्ये या दोन्ही मार्गिकांना केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली व याचवर्षी २४ डिसेंबर २०१६ रोजी पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील ३३.२८ किलोमीटरच्या मेट्रो मार्गाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. एक ऑगस्ट २०२३ मध्ये पिंपरी-चिंचवड ते सिव्हिल कोर्ट व वनाज ते रूबी हॉल या दोन मार्गिका प्रवाशांसाठी सुरू करण्यात आल्या आहेत. या दोन्ही मार्गिकांना प्रवाशांची पसंती मिळत असून, विशेषतः पिंपरी-चिंचवडहून पुण्यात येणाऱ्या विद्यार्थी व नोकरदार वर्गाची यामुळे सोय झालेली आहे. या मार्गावरील स्वारगेटपर्यंतच्या टप्प्याचे काम मार्च २०२४ पर्यंत पूर्ण होऊन पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट असा १७.५३ किलोमीटरचा मार्ग प्रवाशांसाठी सुरू होणार आहे. या मार्गावरील ११.४५ किलोमीटरचा पल्ला हा इलेव्हेटेड असून ६.०८ किलोमीटरचा मार्ग भूमिगत आहे. या मार्गावर पाच भूमिगत मेट्रो स्थानके आहेत. तर वनाज ते रामवाडी ही १५.७५ किलोमीटरची मेट्रो मार्गिका पूर्णपणे इलेव्हेटेड आहे.

भविष्यातील प्रकल्प
- टप्पा १
पिंपरी-चिंचवड मार्गिकेचा निगडीपर्यंत विस्तार करण्यास केंद्र सरकारची नुकतीच मंजुरी मिळाली आहे. निगडी ते पिंपरी या ४.४१३ किलोमीटर टप्प्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. तर स्वारगेट ते कात्रज हा मेट्रो विस्ताराचा प्रस्ताव मान्यतेसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे.

- टप्पा २
दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो प्रकल्पाचे प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलेले आहेत. यामध्ये वनाज ते चांदणी चौक १.१२ किलोमीटर, रामवाडी ते वाघोली ११.६३ किलोमीटर, खराडी ते खडकवासला २५.६ किलोमीटर, नळस्टॉप ते वारजे-माणिक बाग ६.१ किलोमीटर या मार्गांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई इंडियन्सच्या 'या' पठ्ठ्याने भाव खाल्ला, ईशान किशनपेक्षाही टी२० लीगच्या लिलावात महागडा ठरला

Illegal Night Camping : शिरोता वनक्षेत्रात विनापरवानगी नाईट कॅम्पिंगवर धडक कारवाई; दोन कंपन्यांचे प्रतिनिधी अटकेत

मालिका विश्वातून थेट व्यावसायिक रंगभूमीवर; 'आता थांबवायचं कसं?' मधून ऐश्वर्या शेटेचे दमदार पदार्पण!

Daund Crime: दौंडमध्ये रिलॅक्स इन लॉजवर छापा; सहा महिलांची सुटका, दोन बांगलादेशी महिला ताब्यात

Flash Sale : ना ॲमेझॉन, ना फ्लिपकार्ट! 'या' ठिकाणी सुरुय बंपर सेल; 30 ते 50% पर्यंत डिस्काउंट, खरेदीसाठी लागल्या रांगा

SCROLL FOR NEXT