पिंपरी-चिंचवड

पन्नास पावलांवर स्मशानभूमी; मात्र वळसा दीड किलोमीटरचा

CD

जुनी सांगवी, ता. २ ः गेल्या वर्षापासून हिंदू स्मशानभूमी व मुस्लिम दफनभूमीकडे जाण्यासाठी फुगेवाडीकरांची रेल्वे रूळावरून पूर्वीपासून होणारी ये-जा रेल्वे प्रशासनाने बंद केली आहे. परिणामी, पन्नास पावलावर असलेल्या स्मशानभूमी आणि दफनभूमीकडे जाण्यासाठी नागरिकांना दापोडी मार्गे एक ते दीड किलोमीटरचा वळसा घालून जावे लागत आहे. भुयारी मार्गाच्या प्रस्तावालाही रेल्वेकडून अद्याप हिरवा कंदील मिळालेला नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहराचे प्रवेशद्वार म्हणून फुगेवाडीची ओळख आहे. तेथील लोकसंख्या सुमारे हे नऊ हजाराच्या आसपास आहे. एकीकडे पवना नदीकाठ; तर दुसरीकडे शहराचा मुख्य रस्ता व मेट्रो स्थानक. रस्त्यांची विकास कामे, मेट्रो विकास प्रकल्पात फुगेवाडीकरांचे मोठे योगदान आहे. असे असले तरी गेल्या दीड वर्षांपासून त्यांना स्मशानभूमी व मुस्लिम दफनभूमीकडे ये-जा करण्यासाठी झगडावे लागत आहे.
गेल्या वर्षापासून स्मशान भूमी व मुस्लिम दफनभूमीकडे जाण्यासाठी फुगेवाडीकरांची रेल्वे रूळावरून पूर्वीपासून होणारी ये - जा रेल्वे प्रशासनाने बंद केली आहे. प्रशासनाने या सर्व भागात लोखंडी खांब व पत्रे लावले आहेत.

भुयारी मार्गाची व्यवस्था हवी
दापोडी येथील सिद्धार्थनगरच्या धर्तीवर भुयारी मार्गाची व्यवस्था करावी, अशी मागणी गेली चौदा महिन्यांपासून फुगेवाडी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात येत आहे. भुयारी मार्गाचे काम सुरू करून फरपट थांबवावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

बजेट, आराखडा तयार, पण रेल्वेची मंजुरी नाही
महापालिकेकडून भुयारी मार्गासाठी बजेट व आराखडा तयार आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाची अंतिम मंजुरी मिळाली नसल्याने येथील कामास दिरंगाई होत आहे. तर गेली दीड वर्षांपासून विद्यमान खासदार, रेल्वे प्रशासन, महापालिका प्रशासन यांच्याकडे पाठपुरावा सुरू असून देखील फुगेवाडीकरांचा प्रश्न सुटत नसल्याने या दिरंगाईस रेल्वे प्रशासन, महापालिका प्रशासन की कन्सल्टंट जबाबदार ? असा संतप्त सवाल फुगेवाडीकर विचारत आहेत.

गेल्या दीड वर्षांपासून समस्त फुगेवाडीकरांना कसरत करावी लागत आहे. त्यासाठी आमचे गाऱ्हाणे घेऊन सर्वांकडे गेलो. आमची अडचण लक्षात घेऊन तात्काळ प्रश्न सोडवला जाणे अपेक्षित आहे. येत्या पंधरा दिवसांत प्रश्न मार्गी न लागल्यास फुगेवाडीतील नागरिकांना आंदोलन करावे लागेल.
- मनोज वाखारे, नागरिक, फुगेवाडी

फुगेवाडीतील लोकांची खूप गैरसोय होत आहे. रेल्वे स्थानकापलीकडे स्मशानघाट, महादेव मंदिर असल्याने नागरिकांना रहदारीसाठी समस्येला सामोरे जावे लागत आहे. हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा.
- रूपेश फुगे, नागरिक

महापालिका प्रशासनाकडून फुगेवाडीमधील नागरिकांच्या रहदारीच्या प्रश्नाबाबत बजेट मंजूर आहे. रेल्वेकडून अंतिम मंजुरीची प्रतिक्षा आहे. ती मिळाल्यानंतर येथील कामास सुरुवात करण्यात येणार आहे.
- प्रमोद ओंभासे, कार्यकारी अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT