पिंपरी-चिंचवड

अखेर फुगेवाडी ग्रामस्थांची फरफट थांबणार

CD

जुनी सांगवी, ता. ३ ः गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेली हिंदू स्मशानभूमी व मुस्लिम दफनभूमीकडे ये-जा करण्यासाठी फुगेवाडी गावकऱ्यांची रस्ता भुयारी मार्गाची अखेर टेंडर मंजुरी झाली असून, येथील रस्ता प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून फुगेवाडी गावकरी काही अंतरावरच असलेल्या स्मशानभूमी व दफनभूमीकडे जाण्यासाठी रेल्वे रुळावरून ये-जा करायचे. तीन वर्षांपूर्वी रेल्वेकडून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून रुळावरून होणाऱ्या रहदारीस प्रतिबंध करून, या भागात पत्रा खांब लावून, रुळावरून होणारी ये-जा बंद केली. यामुळे हिंदू स्मशानभूमी व मुस्लिम दफनभूमीकडे अंत्यविधी व इतर विधीसाठी फुगेवाडी नागरिकांना दापोडीमार्गे साधारण एक ते दीड किलोमीटर वळसा घालून जावे लागत होते. यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. रेल्वे व महापालिका प्रशासनाने गावकऱ्यांची होणारी अडचण समजून गावकऱ्यांनी एकत्र येत भुयारी मार्गाची व्यवस्था करावी, अशी मागणी केली होती. गेल्या दोन-तीन वर्षांपासून फुगेवाडी गावकऱ्यांनी याबाबत महापालिका प्रशासन, रेल्वे प्रशासन, स्थानिक खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, रेल्वे प्रशासन यांच्याकडे मागणी केली होती. पावसाळ्यात होत असलेली दमछाक व वळसा घालून जावे लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. महापालिका प्रशासनाकडून येथील कामाचे बजेट मंजूर करूनही रेल्वे प्रशासनाच्या मंजुरीसाठी गेल्या वर्षभरापासून येथील प्रश्न रखडला होता. अखेर टेंडर मंजुरी मिळाल्यानंतर फुगेवाडी गावकऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढून आनंद व्यक्त केला. येथील कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लागल्याने गावकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

‘सकाळ’चे मानले आभार
वेळोवेळी गावकऱ्यांच्या मागणीस ‘सकाळ’मधून पाठपुरावा केल्याने गावकऱ्यांनी ‘सकाळ’चे आभार मानले.

दृष्टिक्षेपात
- असे आहे काम- फुगेवाडी हिंदू स्मशानभूमी आणि मुस्लिम दफनभूमीकडे जाण्यासाठी रेल्वेलाइन व ३० मी. एचसीएमटीआर खालून भुयारी मार्ग बांधणे.
- कामाची रक्कम - १५ कोटी ५६ लाख ५४ हजार रुपये
- कामाची मुदत २४ महिने

‘‘गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न रखडला होता. नागरिकांना अंत्यविधी करण्यासाठी नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते. प्रश्न मार्गी लागल्याने प्रशासनासह ‘सकाळ’चे गावकऱ्यांच्या वतीने आभार. वेळोवेळी ‘सकाळ’ माध्यमने येथील मागणीस वाचा फोडण्याचे काम केले.
- मनोज वाखारे, नागरिक, फुगेवाडी

‘‘फुगेवाडीतील नागरिकांची कायमची फरफट थांबली याचे समाधान आहे. अखेर हा प्रश्न मार्गी लागला. समस्त फुगेवाडी ग्रामस्थ मुस्लिम समाज बांधवांच्या मागणीला न्याय मिळाला.
- रूपेश फुगे, नागरिक

‘‘कामाची टेंडर मंजुरी होऊन निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. येथील गावकऱ्यांची भुयारी रस्ता मार्गामुळे कायमस्वरूपाची अडचण सुटणार आहे.
- प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway Traffic : वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनांकडून टोल घेऊ नका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सूचना

Who is Arshad Khan? मुंबई इंडियन्सने पहिली संधी दिली अन् तो आता गुजरात टायटन्ससाठी ठरतोय एक्स फॅक्टर; RCB लाही दिलाय त्रास

Central Railway: मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक, लोकल सेवा पूर्ण बंद राहणार, मेल गाड्यांनाही फटका बसणार; कधी आणि कुठे?

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये ग्रामपंचायतीचा अभिनव निर्णय; विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना घरपट्टी माफी

Thane: ‘घोडबंदर’चा बोजा ठाणे पालिकेवर, देखभालीसाठी अडीच कोटींचा खर्च

SCROLL FOR NEXT