पिंपरी-चिंचवड

पवनाथडी यात्रेच्या नियोजनात अखेर सुधारणा

CD

जुनी सांगवी, ता.१९ ः सांगवी येथील पवनाथडी यात्रेसाठी महिला बचत गटांची लगबग सुरू झाली असून महापालिका प्रशासनाने देखील ‘सकाळ’च्या वृत्ताची दखल घेत यंदा नियोजनात सुधारणा केल्या आहेत. नागरवस्ती विभागाच्यावतीने प्रत्येक बचत गटांना आज गुरुवारी (ता.२०) लॉटरी पद्धतीने स्वतंत्र गाळ्यांचे वाटप केले जाणार आहे.
गृहिणी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात, त्यांच्यामधील उद्योजकतेला व्यासपीठ मिळावे यासाठी महापालिकेकडून दरवर्षी पवनाथडी यात्रा भरविली जाते. यंदा सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर शुक्रवार (ता.२१) पासून यात्रेला सुरुवात होणार आहे. गेल्या वर्षी यात्रेच्या नियोजनात अनेक त्रुटी जाणवल्या. त्या यंदा दूर केल्या जाणार अथवा नाही याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने नियोजनात सुधारणा केल्या आहेत.
गेल्या वर्षी यात्रेसाठी १० फूट बाय १० फूट आणि १० फूट बाय १५ फूट असे एकूण ४१८ गाळे महापालिकेने बचत गटांना उपलब्ध करुन दिले होते. तसेच खाऊगल्लीतील एका गाळ्यात दोन बचत गटांना स्थान दिले होते. त्यामुळे, दोन्ही बचत गटांतील महिलांची गैरसोय झाली होती. स्वयंपाकासाठी हे गाळे अपुरे पडत होते. हे लक्षात घेऊन प्रशासनाने यंदा सर्व बचत गटांसाठी १० फूट बाय १० फूट असे एकाच आकाराचे स्वतंत्र गाळे सरसकट उपलब्ध केले आहेत. गेल्या चार दिवसांपासून महापालिका प्रशासनाच्यावतीने हे गाळे बांधले जात आहेत. याशिवाय, दरवर्षीप्रमाणे सर्वसाधारण गट, शाकाहारी खाद्यपदार्थ विक्री गट, मांसाहारी पदार्थ विक्री गट, वस्तू विक्री, खेळणी अशी यात्रेची रचना करण्यात आली आहे. याचबरोबर यात्रेत सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. त्यासाठी सांस्कृतिक मंडपाचे काम पूर्णत्वाकडे आले आहे.

असे राहणार कार्यक्रम...
पवनाथडी यात्रेचे शुक्रवारी (ता.२१) उद्‍घाटन झाल्यावर सायंकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत समर्थ प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘महाराष्ट्राची गौरवगाथा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. याखेरीज, शनिवारी (ता.२२) एम. एस. शेख प्रस्तुत ‘मेरा भारत महान’, रविवारी (ता.२३) सौ. एस. के. कांबळे प्रस्तुत ‘जागर आदिशक्तीचा - सूर गृहलक्ष्मीचा’ तर सोमवारी (ता.२४) श्री विजयकुमार उलपे प्रस्तुत ‘जगत सुंदरी’ या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पवनाथडी जत्रेसाठी सर्व महिला बचत गटांना सामावून घेण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाणार आहे. शहरातील सर्व नागरिकांनी जत्रेचा आनंद घ्यावा.
- तानाजी नराळे, समाज विकास अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका

यंदाच्या सुधारणा अन् व्यवस्था
- प्रत्येक बचत गटाला स्वतंत्र गाळे
- सर्व गटांना सरसकट १० फूट बाय १० फूटचे गाळे
- सांस्कृतिक मंडपाच्या मागील बाजूस वाहनतळाची स्वतंत्र व्यवस्था
- खाऊगल्लीसाठी साहित्य ने-आण करण्यासाठी मागील बाजूने स्वतंत्र रस्ता
- अग्निशमन दल, विद्युत विभागाचे कर्मचारी तैनात राहणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT