पिंपरी-चिंचवड

चौकाचौकांतील ‘दादांचा कट्टा’ बकाल

CD

जुनी सांगवी, ता. १४ : जुनी सांगवी येथे महापालिकेच्या वतीने मॉडेल वार्ड संकल्पनेतून २०१४ ते २०१७ दरम्यान रस्त्याकडेला चौकांमधून उभारण्यात आलेली ‘विसावा ठिकाणे’ अर्थात ‘दादांचा कट्टा’ बकाल अवस्थेत आहेत. ऊन-वारा-पावसात पादचारी, ज्येष्ठ नागरिक, इतर सर्वांचेचे संरक्षण व्हावे या हेतूने मुख्य चौक व रस्त्याकडेला या विसावा ठिकाणांची निर्मिती करण्यात आली होती.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने जुनी सांगवी २०१४ ते २०१७ या काळात मॉडेल वार्ड या संकल्पनेतून परिसरात विविध कामे करण्यात आली. या अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी मेघडंबरी आकाराचा निवारा करण्यात आला. २०१७ नंतर या संकल्पनेला दुर्लक्षित केले गेल्याने कट्ट्यांची दुरावस्था झाली आहे. २०१४ ते २०१७ या कालावधीत जुनी सांगवी येथे शहरातील पहिली पर्यावरणपूरक शवदाहिनी, अंतर्गत रस्ते व चौकांचे सुशोभीकरण करून आकर्षक वाहतूक बेटांची निर्मिती करण्यात आली. मुख्य रस्त्याकडेला ‘दीपमाळ’ संकल्पनेतून विद्युत प्रकाश व्यवस्था, दादांचा कट्टा ही संकल्पना जुनी सांगवीत राबविण्यात आली होती. शिवसृष्टी उद्यान कोपरा, जयमाला नगर मुख्य चौक, वसंतदादा पाटील पुतळा बसस्थानक मुख्य चौक, प्रियदर्शनीनगर छावा चौक, माहेश्वरी चौक या ठिकाणी मेघडंबरी आकारांचे दादांचे कट्टे उभारण्यात आल होते. आता तुटलेल्या फरशा, रंग उडालेली मेघडंबरी, अस्वच्छता व सोयी सुविधा नसल्याने या कट्टयांना बकालपणा आला असून कट्टे ओसाड पडले आहेत. तर काही ठिकाणी अजूनही यांचा उपयोग केला जात आहे. मात्र, या कट्टयांचे सुशोभीकरण करण्यात यावे, उन्हाळ्यात या कट्टयांचा पादचारी, ज्येष्ठ नागरिक विसाव्यासाठी उपयोग करतात. तेथे पिण्याचे पाणी, वाचनासाठी नियमित पेपर, बसचे वेळापत्रक अशी व्यवस्था करावी. स्थानिक मंडळे सामाजिक संस्था यांना याची देखभाल द्यावी, अशी मागणी होत आहे.

विसावा ठिकाणे ही संकल्पना चांगली असली तरी त्याची देखभाल व सुशोभीकरण करण्यात आले नसल्याने दुरवस्था झाली आहे.
- स्वामिनी जाधव, नागरिक.

पावसाळ्यात, उन्हाळ्यात हे कट्टे पादचारी आणि ज्येष्ठांसाठी उपयोगी ठरतात. येथे सुशोभीकरण करून सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.
- रुपेश पुजारी, नागरिक

जुनी सांगवी परिसरातील विसावा ठिकाणांची पाहणी करून त्यांच्या डागडुजीबाबत स्थानिक पातळीवर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.
- प्रशांत कोटकर, अभियंता, स्थापत्य ‘ह’ प्रभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT