पिंपरी-चिंचवड

जुनी सांगवीतील शिवसृष्टी उद्यानाचे काम अखेर सुरू

CD

सकाळ इम्पॅक्ट

जुनी सांगवी, ता.१८ ः बालगोपाळांचा उन्हाळी सुटीचा हंगाम संपल्यावर महापालिकेच्या उद्यान स्थापत्य विभागाला जाग आली असून या विभागाकडून आता पावसाळ्यात जुनी सांगवी येथील महापालिकेच्या स्व. तानाजीराव शितोळे (शिवसृष्टी) उद्यानात दुरुस्ती कामे सुरू करण्यात आली आहे.
प्रवेशद्वारावरील हत्तींमुळे बालचमूंमध्ये शिवसृष्टी उद्यानाची ‘हत्ती गार्डन’ अशीही या उद्यानाची ओळख आहे. मात्र तेथील खेळण्यांच्या दुरवस्थेने बालचमूंचा हिरमोड झाला होता. याबाबत ‘सकाळ’ मधून ‘शिवसृष्टी उद्यानाचे अंतर्गत सुशोभीकरण कधी’ या शीर्षकाखाली सचित्र वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याची दखल घेत प्रशासनाकडून येथील दुरुस्ती कामे सुरू करण्यात आली आहेत. तत्पूर्वी, वृत्ताची दखल घेत आमदार शंकर जगताप यांनी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत उद्यानाला भेट देत तेथील तुटलेली खेळणी व इतर दुरुस्ती कामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
सध्या उद्यानातील ध्यान धारणा केंद्र इमारतीतील आतील भिंतींची दुरूस्ती, रंगरंगोटी, प्रवेशद्वारावरील हत्ती शिल्पांचे रंगकाम प्रवेशद्वार दुरूस्ती व रंगकाम, मावळ्यांच्या प्रतिकृती शिल्पांचे रंगकाम, झाडांची छाटणी, पिण्याचे व वापरण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था आणि प्रकाश व्यवस्थेची तयारी सुरू आहे.

तुटलेली खेळणी, नादुरुस्त ओपन जिम साहित्य व इतर असुविधांमुळे या उद्यानात येणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. उन्हाळ्यापूर्वीच ही कामे करणे अपेक्षित होते. मात्र तसे न झाल्याने विद्यार्थ्यांचा सुट्टीचा हंगाम वाया गेला.
- रूपेश पुजारी, नागरिक

जलवाहिनीतील गळतीची दुरुस्ती झाली आहे. प्रवेशद्वार, हत्ती रंगकाम व इतर दुरुस्ती कामे सुरू आहेत. इमारतीच्या बाह्यभागाच्या रंगरंगोटीची कामे पावसाळ्यानंतर करण्यात येतील.
- राजश्री सातळीकर, अभियंता, उद्यान व क्रीडा स्थापत्य विभाग
PIM25B19943

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Reserves: अनेक जिल्ह्यांत सापडले सोन्याचे साठे; राज्याचं भविष्य बदलणार, किती आहे सोनं?

Latest Marathi News Live Updates : मुंबईत मुसळधार पाऊस, अनेक भागात साचलं पाणी

Vande Bharat Express: देशातील लांब पल्याची वंदे भारत महाराष्ट्रात; प्रवाशांसाठी आरामदायक, पुणे नागपूर ठरली सर्वाधिक दूरची रेल्वे

Pune Crime : तुझे अनैतिक संबंध, तलाक दे नाही तर... पुण्यात भरचौकात तरुणीवर धारदार शस्त्राने हल्ला

'सगळ्यांनी माझं हसू केलं, पण आता...' अभिषेक बच्चनसाठी बिग बींची भावूक पोस्ट, म्हणाले...'त्या थट्टेची जागा...'

SCROLL FOR NEXT