पिंपरी-चिंचवड

तळवडे चौकाचा श्वास कोंडला

CD

पिंपरी ः तळवडे ते निगडी अरुंद रस्ता असल्याने मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. त्याचा थेट परिणाम देहू-आळंदी रस्त्यावर तळवडे चौकावर होऊन तो ‘ब्लॉक’ होतो. त्यामुळे देहू, तळवडे आयटी पार्क व म्हाळुंगे एमआयडीसी आणि चिखली, निगडीकडून येणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. वाहतूकही ठप्प होते. वाहनचालक नियमांचे पालन करत नसल्याने आणि बहुतांश वेळा सिग्नल बंद असल्याने कोंडीत भर पडत आहे. वाहतूक कोंडीत तासनतास अडकून पडत असल्याने विद्यार्थी, कामगार आणि उद्योजक त्रस्त झाले आहेत.

कोंडीची कारणे
- वाहनचालक उलट्या दिशेने वाहने घेऊन जातात
- ट्रेलर, कंटेनर वळविताना वेळ लागत असल्याने सिंग्नलची वेळ निघून जाते
- सिग्नल न पाळता वाहने दामटणे
- अरुंद रस्ता व खड्ड्यांची भर

उपाययोजना काय
- निगडी-तळवडे रस्ता रुंदीकरण
- सिग्नल यंत्रणेतील टायमिंग वाढवणे
- देहू- आळंदी मार्गांवरील खड्डे बुजविणे
- चौकातील रिक्षा स्टँड हलवणे

मी रावेतवरून कामासाठी चाकण एमआयडीसीत जातो. दररोज सकाळी नऊ ते अकरा आणि सायंकाळी सहा ते नऊ या कालावधीत त्रिवेणी चौक ते कॅनबे चौकापर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी असते. बऱ्याच वेळा दोन ते तीन तास लागतो, हे अंतर पार करण्यासाठी लागतो. यावर कायमस्वरूपी उपाययोजना केल्या पाहिजेत.
- मनोज चव्हाण, वाहनचालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंचा मनसैनिकांना स्पष्ट अन् कडक आदेश; म्हणाले, ‘’मला विचारल्याशिवाय…’’

विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीचं सरन्यायाधीशांना साकडं; पत्र देऊन व्यक्त केली नाराजी...

Thane Politics: भाजपचे विकास म्हात्रेंचा युटर्न! वरिष्ठांनी मनधरणी करताच गैरसमज दूर

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Indian Railway: गणेशोत्सवाचे आरक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करा, रेल्वेकडे प्रवासी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT