पिंपरी-चिंचवड

वाहतुकीत बदल करा; अतिक्रमणे हटवा

CD

पिंपरी, ता. २५ : हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत राज्य शासनाने आदेश दिल्यानंतर पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी तेथील रस्त्यांची पाहणी केली. वाहतुकीत बदल करणे, अतिक्रमणे हटविण्यासाह त्यांनी विविध उपाययोजना सुचविल्या.
यावेळी सह पोलिस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आव्हाड, ‘पीएमआरडीए’चे अपर आयुक्त दीपक सिंगला, वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक पाटील, पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड, सहायक पोलिस आयुक्त सुनील कुराडे, हिंजवडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे, ‘अनक्लॉग हिंजवडी आयटी पार्क’ मोहिमेचे सदस्य आणि आयटी कर्मचारी उपस्थित होते.
चौबे यांनी कोंडी होणाऱ्या ठिकाणांची पाहणी करून उपाययोजना सुचविल्या. सतत कोंडी होणाऱ्या रस्त्यांवर तसेच चौकांतील वाहतूक वळवावी. काही ठिकाणी एकेरी वाहतूक करण्यात यावी. हे बदल प्रायोगिक तत्त्वावर महिनाभर करण्यात यावेत, अशा सूचना त्यांनी केल्या.
हिंजवडी पोलिस ठाणे तेथील पुलाच्या सेवारस्त्यालगत असलेले महावितरण कंपनीचे रोहित्र (डीपी) हटविण्याबाबतही त्यांनी सूचना केली. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी विविध बस थांब्यांवर दामिनी पथकांची नेमणूक करण्याचे आश्वासन त्यांनी आयटी कर्मचाऱ्यांना दिले. पदपथाला अडथळा होतील असे बस थांबे मागे घेण्याबाबत त्यांनी ‘पीएमपी’च्या अधिकाऱ्यांशी चर्चाही केली.
--
उपाययोजना अशा
- जांभूळकर चौक, इंडियन ऑइल पेट्रोल पंप चौकातील सर्कलवरील वाहतुकीचे नियमन
- शेल पेट्रोल पंप चौकात विरुद्ध दिशेने येणारी वाहतूक बंद करण्यासाठी बॅरिकेड््सची उभारणी
- माईंड ट्री कन्सल्टिंग चौकातील वाहतूक उपाययोजनांचा आढावा
- क्रोमा चौक येथे मेट्रो स्थानकाच्या जिन्याची रुंदी कमी करून ‘फ्री लेफ्ट’ सुरू करणे
- विप्रो सर्कल येथे ‘फ्री लेफ्ट’ सुरू करणे
- रस्ता दुरुस्ती करून वाहतुकीत बदल
- डोहलर कंपनीजवळील नाल्यावरील अतिक्रमण हटविण्याच्या सूचना
- एमआयडीसी सर्कल येथे विरुद्ध दिशेने जाणारी वाहने थांबवण्यासाठी बॅरिकेडस लावले
- मेगा पोलिस सर्कल येथे बससाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची सूचना
- पांडवनगरमधील हटविलेल्या अतिक्रमणाची पाहणी
- उर्वरित अतिक्रमणे हटविण्याच्या सूचना
-----

फोटो
34441
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दारू ड्रग्ज हुक्का...! पुण्यातल्या रेव्ह पार्टीत बड्या राजकीय नेत्याचा पती सापडला! २ महिलांसह ५ पुरुषांना घेतलं ताब्यात

American Airlines Flight : उड्डाण करतानाच विमानाच्या लॅंडिंग गियरमध्ये आग, १७३ प्रवाशांसह ६ क्रू मेंबर्सचा जीव टांगणीला अन्...

Satej Patil : माणसं येतात जातात परंतु माणसं तयार करणारी फॅक्टरी बंटी पाटील हाय..., आमचं ठरलयं नाही आता त्यांचा करेक्ट कार्यक्रमचं

Latest Maharashtra News Updates: उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रात सकाळी 7 वाजल्यापासून 35000 विसर्ग

Pune Traffic : गणेशोत्सवाच्या तयारीसोबत खरेदीची गर्दी; पुण्याच्या मध्यवर्ती भागांत वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT