पिंपरी-चिंचवड

प्रा. डॉ. लबडे यांच्या कादंबरीचा इंग्रजीमधील अनुवाद प्रकाशित

CD

पिंपरी, ता. २८ ः पिंपळे सौदागर येथील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे यांच्या ‘शेवटची लाओग्राफिया’ या कादंबरीचा चा इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध झाला. ‘द लास्ट फोकटेल’ असे इंग्रजीतील अनुवादित आवृत्तीचे नाव आहे. ज्येष्ठ अनुवादक डॉ. विलास साळुंखे यांनी हा अनुवाद केला आहे. ही आवृत्ती ऑथर्स प्रेस या आंतरराष्ट्रीय प्रकाशन संस्थेकडून दिल्लीत नुकतीच प्रकाशित करण्यात आली.
मुळ कादंबरी २०२२ मध्ये अथर्व पब्लिकेशनने प्रसिद्ध केली होती. या कादंबरीची मराठीतील अनेक ज्येष्ठ समीक्षकांनी प्रशंसा केली. या कादंबरीला अनेक राज्यस्तरीय पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. ही बहुचर्चित कादंबरी इंग्रजी वाचकांसाठी खुली झाल्यामुळे मराठी साहित्यातील समृद्ध परंपरेचे दर्शन आंतरराष्ट्रीय स्तरावर झाले आहे.
उत्तराधुनिक शैली, मनोविश्लेषण, लोक-सांस्कृतिक दृष्टिकोन यामुळे ‘द लास्ट फोकटेल’ ही आगळी साहित्यकृती ठरते. प्रा. डॉ. लबडे यांची यापूर्वी सतरा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांना अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार आणि मानसन्मान प्राप्त झाले आहेत.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Dam Storage : पुणेकरांनो सावधान! खडकवासला धरणातून विसर्ग वाढण्याची शक्यता, कोणत्या परिसरात जाण्यास मनाई?

Solapur News: आनंदाची बातमी! 'महिलांना एक रुपयाही न भरता मिळणार ई-पिंक रिक्षा'; अर्जासाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदत

Latest Marathi News Updates : रशियामध्ये ८.७ तीव्रतेचा मोठा भूकंप, जपानसह अमेरिकेवर परिणाम; काही तासांत त्सुनामीचा इशारा

Macau Open 2025: मकाऊ ओपनमध्ये भारताची दुहेरी चमक; सात्विक-चिराग जोडी पुढल्या फेरीत दाखल

धक्कादायक! 'कऱ्हाडच्‍या पुलावरून तरुणीची नदीत उडी'; लग्न ठरलं अन् दोन दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला, नेमक काय कारण..

SCROLL FOR NEXT