पिंपरी-चिंचवड

अगोदरच कमी कचरा संकलन वाहने, त्यात नादुरुस्तची भर !

CD

जुनी सांगवी, ता.१३ ः पिंपळे निलख परिसरात अगोदरच कचरा संकलन वाहनांची कमतरता असताना त्यात नादुरुस्त वाहनांची भर पडली असून स्वच्छता राखणे हे महापालिकेच्या आरोग्य विभागासाठी मोठे आव्हान ठरत आहे. दररोज मोठ्या प्रमाणावर घरगुती, व्यावसायिक कचरा निर्माण होत आहे. नागरिक रस्त्याकडेलाही कचरा टाकत आहेत. त्यामुळे स्वच्छता राखण्यासाठी आरोग्य विभागाला कसरत करावी लागत आहे.
पिंपळे निलख येथील कस्पटे चौकातून वाकडच्या स्मशानभूमी शेजारील मुळा नदीवरून जाणारा आणि वाकड-बालेवाडी परिसराला जोडणारा नवीन वाकड-बालेवाडी पूल अनेक वर्षांपासून पुणे हद्दीच्या बाजूने अर्धवट अवस्थेत आहे. त्याच्या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून नागरिक मोठ्या प्रमाणावर कचरा टाकत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाला येथे नियमित स्वच्छता करावी लागत आहे.
याखेरीज, मुख्य रस्ता, पंचशीलनगर, विशालनगर डीपी रस्ता, टकलेनगर, रक्षक चौक आदी रस्त्यांच्या कडेला कचऱ्याचे ढीग साचत आहेत. प्लॅस्टिक पिशव्यामंधून खरकटे, शिळे अन्न सर्रास उघड्यावर टाकले जात असल्याने परिसरात दुर्गंधी, जनावरांचा वावर वाढला आहे. तसेच जनावरांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे.
अपुरी साधने आणि वाढत्या लोकसंख्येमुळे आरोग्य विभाग उपाय योजना करण्यात अपुरा पडत आहे. सद्यःस्थितीत कचरा संकलन वाहनांची संख्या अपुरी ठरत असल्याने अतिरिक्त वाहने वाढवावीत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

स्वच्छता अभियान
दिवाळी सणाच्या तोंडावर आरोग्य विभागाकडून संपूर्ण स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे. रस्त्याकडेला पडणारा कचरा, गवत, स्वच्छता करण्यात येत आहे. मात्र, त्यात नियमितपणा हवा, असा नागरिकांमधून सूर आहे. अपुऱ्या वाहनांमुळे टकलेनगर परिसरात कचरा संकलनासाठी वाहने नियमित येत नसल्याने तेथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. संपूर्ण पिंपळे निलख परिसरात कचरा संकलन वाहनांची संख्या वाढवावी, नियमित वेळा पाळाव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून टकलेनगर परिसरात कचरा गाडी नियमित येत नसल्याने नागरिकांकडे कचरा साचला जात आहे. कचरा संकलन वाहनांची संख्या वाढवून नियमितता हवी आहे.
- आकाश दोडके, रहिवासी, टकलेनगर

पूल परिसर, रस्त्याकडेला पडणारा कचरा रोखण्यासाठी उपाय योजना कराव्यात. मनुष्यबळासह कचरा संकलन करणाऱ्या वाहनांची संख्या वाढवावी.
- विठ्ठल कोरे, नागरिक


पिंपळे निलख परिसरातील नागरिकांनी कचरा वेगळा करून द्यावा. रस्त्यांवर टाकू नये यावर भर दिला जात आहे. कचरा टाकल्या जाणाऱ्या जागा आणि रस्त्यांवर कचऱ्याचे नियमित संकलन केले जात आहे. तसेच स्वच्छता केली जात आहे. स्वच्छता मोहीम अधिक प्रभावी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.
- खंडेराव बैलकवाड, आरोग्य निरीक्षक, पिंपळे निलख

कचरा संकलन व्यवस्था सद्यःस्थिती
कचरा संकलन वाहने -९
कॉम्पॅक्टर- ४
एकूण गाड्या - १३
मनुष्यबळ - ७६
PNE25V59669

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT