पिंपरी-चिंचवड

सांगवीत कर्करोग, आरोग्य तपासणी शिबिर

CD

जुनी सांगवी, ता. ३ : जुनी सांगवी येथे कर्करोग व आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. जिल्हा रुग्णालय, फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशन, प्रज्ञा दीप सोशल फाउंडेशनने याचे आयोजन केले.
शिबिरात मुख कर्करोग, स्तनांचा कर्करोग, गर्भाशय कर्करोगाची तपासणी करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन सांगवी महापालिका रुग्णालयाच्या डॉ. वैशाली भामरे यांनी केले. ‘‘कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे बहुतांश महिला नियमित आरोग्य तपासणी करत नाहीत. पण, त्यांनी नियमित आरोग्य तपासणी करावी,’’ असे आवाहन डॉ. भामरे यांनी केले.
शिबिराचे नियोजन डॉ. प्रकाश रोकडे, तृप्ती कांबळे व संतोष कांबळे यांनी केले. मॅमोग्राफीसाठी हेल्थ विदीन रीच फाउंडेशन यांनी व्हॅन उपलब्ध करून दिली. आरोग्य तपासणीसाठी डॉ. रुपाली फुलबांदे, मोनिका सहाय, संगीता कुट्टी, वैद्यकीय अधिकारी डॉ. सिमरन थोरात, एकता महाडिक, सीमा सूर्यवंशी व कर्मचारी यांनी सहकार्य केले. शिबिर यशस्वी होण्यासाठी वैशाली गायकवाड, रवींद्र यादव, अमित बाराथे, हर्षल कांबळे आदींनी पुढाकार घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arijit Singh Retirement : शेवटी मी धाडस केलं! अरिजीत सिंहने सांगितलं निवृत्तीचं कारण, म्हणाला, मी जगू शकेन

Latest Marathi News Live Update : अमृता फडणवीसांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्ये; अंजली भारती यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश

Pune News: पुणे विमानतळ ‘एएसक्यू’ सर्वेक्षणात पहिले; पाचपैकी मिळवले ४.९६ गुण, सेवेच्या दर्जात सातत्याने वाढ!

Mumbai : स्कूलबसने चिरडल्यानं एक वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू, आजी गंभीर जखमी; नातीला आणायला गेल्यावर अपघात, घटना CCTVमध्ये कैद

Mumbai News: राज्यातील आयटीआय कात टाकणार! राज्य मंत्रिमंडळ बैठक, ‘पीएम सेतू योजने’अंतर्गत आधुनिकीकरण होणार..

SCROLL FOR NEXT