पिंपरी, ता.२ ः दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दापोडी येथे क्रीडापटूंच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. अजित पवार हे क्रीडाप्रेमी होते. क्रीडा क्षेत्रात खेळाडू घडविण्यासाठी त्यांचे मोठे योगदान असल्याच्या भावना क्रीडापटूंनी यावेळी व्यक्त केल्या.
माजी राष्ट्रीय मुष्टियोद्धे डॉ. मदन कोठुळे व संजय कणसे यांच्या हस्ते अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी माजी राष्ट्रीय मुष्टियोद्धे फिरोज खान, देवेंद्रसिंग यादव, शरीरसौष्ठव प्रशिक्षक कैलास जाधव, गणेश जाधव, पीएसआय रोहिदास मुसळे, कबड्डीपटू दगडू कासरूंग, फुटबॉलपटू विवान गायकवाड, क्रीडासंघटक ज्ञानेश्वर भाडळे, नेमबाज यशराज जवळकर, हॉकीपटू केलमेट गायकवाड आदी खेळाडू उपस्थित होते. उदयोन्मुख खेळाडू घडविण्यात अजित पवार यांचे खूप मोठे योगदान होते. प्रत्येक खेळांना नेहमी सहकार्य करणारा खेळाडूंचा हक्काचा माणूस गेल्यामुळे सर्व खेळांडूंचे नुकसान झाले, अशा भावना क्रीडापटूंनी व्यक्त केल्या. अर्जुन कणसे यांनी सूत्रसंचालन केले. कैलाश गायकवाड यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.