पिंपरी-चिंचवड

जुनी सांगवीत पदपथावर अतिक्रमणाचा विळखा

CD

पिंपरी, ता.४ ः जुनी सांगवी येथील महत्त्वाचा व वर्दळीचा असलेल्या पी.डब्ल्यू.डी. सांगवी फाटा रस्त्यावरील पदपथावर दररोज रात्रीच्यावेळी अनधिकृत विक्रेत्यांची गर्दी होत आहे. भाजीपाला, फळे, खाद्यपदार्थ तसेच विविध किरकोळ वस्तूंची दुकाने थेट पदपथावर थाटली जात असल्याने परिसरातील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होत आहे.
सायंकाळनंतर या मार्गावर वाहनांची संख्या वाढते. मात्र, पदपथावरच दुकाने, वाहने उभी करून होणारी वस्तू विक्री आणि त्यामुळे ग्राहकांची वाढती गर्दी यामुळे रस्त्याची रुंदी कमी होते. परिणामी, दुचाकी, रिक्षा व चारचाकी वाहनांची गर्दी होत असून अनेकदा वाहतूक कोंडी निर्माण होते. लगतच मुख्य चौक व रस्ता असल्याने या परिसरात रात्रीची वर्दळ असते. पदपथांवर अतिक्रमण झाल्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा उपलब्ध नसून त्यांना मुख्य रस्त्यावरून चालावे लागते. यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पदपथ हा पादचाऱ्यांसाठी असतो, मात्र या परिसरात तो पूर्णपणे विक्रेत्यांच्या ताब्यात गेला आहे, अशी मत येथील नागरिकांनी व्यक्त केले. महापालिकेने या भागात ठोस कारवाई तसेच पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने येथे प्रतिबंध करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

हा मुख्य रस्ता असल्याने येथे सतत वर्दळ असते. रात्री विक्रेते पदपथावर विक्री करतात. पदपथाच्या कडेला टेम्पो, वाहनांद्वारे विविध वस्तूंची विक्री केली जाते, यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे.
- धम्मरत्न गायकवाड, नागरिक


येथे नियमित कारवाई करण्यात येते. महापालिका अतिक्रमण विभागाशी चर्चा करून येथे संयुक्त कारवाई करण्यात येईल तसेच रात्रीची गस्त वाढविण्यात येईल. अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर, बेकायदा पार्कींगवर नियमित कारवाई सुरू आहे.
- सुदाम पाचोरकर, वाहतूक पोलिस निरीक्षक जुनी सांगवी विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur IT Park : अखेर मंत्रीमंडळ निर्णय झालाच! कोल्हापुरात शेंडा पार्कमध्ये 34 हेक्टर 36 गुंठे जागेत आयटी पार्क विकसित करण्यासाठी प्रस्ताव मंजूर

Mumbai News: सुरक्षा धर्मापेक्षा महत्त्वाची; विमानतळाजवळ नमाज पडण्याचा अधिकार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा स्पष्ट निर्णय

‘बायको पाहिजे’चं पोस्टर सोशल मीडियावर घालतंय धुमाकूळ; व्हायरल पोस्टर बॉय नेमका कोण ?

T20 WC, IND vs ENG SF: नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने! सूर्याने सांगितला आम्हाला हवं तेच झालं; Playing XI मध्ये बघा काय बदल झाला

Horoscop : उद्या 6 मार्चला 'या' 6 राशींचं नशीब चमकणार! अचानक मिळेल मोठी खुशखबर; आर्थिक लाभ संभवतो, नात्याला मिळेल नवी दिशा

SCROLL FOR NEXT