पिंपरी-चिंचवड

श्री आई माता देवी : सीरवी क्षत्रिय समाजाचे कुलदैवत

CD

कासारवाडी येथील कुंदननगरमध्ये रस्त्याच्या बाजूला राज्यातील पहिले श्री आई माता देवीचे मंदिर आहे. जयपूर येथे संगमरवरात तयार करण्यात आलेली अष्टभुजा मूर्ती हे या मंदिराचे वैशिष्ट्ये आहे. श्री आई माता देवी ही सीरवी क्षत्रिय समाजाचे कुलदैवत आहे. तिचे मुख्य स्थान राजस्थानातील जोधपूर जिल्ह्यातील बिलाडा गावात आहे, ज्याचा इतिहास साधारणतः ६०५ वर्षे जुना आहे.
कासारवाडीमध्ये श्री आई माता मंदिर स्थापन करण्याची कल्पना कै. मोहनलाल कृष्णाजी ऊर्फ पुसारामजी काग आणि प्रेमराज कुकाजी गेहलोत यांनी एका बैठकीत मांडली होती. त्यास ७२ जणांनी पाठिंबा दिला आणि १९७५ मध्ये पुणे-मुंबई रस्त्यावरील कासारवाडी येथे मंदिरासाठी दहा गुंठे जागा विकत घेण्यात आली. सुरवातीला पत्र्याच्या छोट्या जागेत श्री आई मातेच्या प्रतिमेची पूजा सुरू झाली.
१४ सप्टेंबर १९९२ रोजी ‘सीरवी क्षत्रिय समाज, पुणे’ संस्थेची स्थापना झाली आणि प्रसिद्ध शिल्पकार भंवरलाल सोमपुरा यांच्या मार्गदर्शनाखाली राजस्थानी कलाकारांच्या मदतीने मंदिराचे बांधकाम सुरू झाले. या मंदिरासाठी राजस्थानातील मकराना येथून संगमरवर आणण्यात आला आणि आठ वर्षांच्या कालावधीत पारंपरिक राजस्थानी पद्धतीने मंदिर उभारण्यात आले.

मूर्ती प्रतिष्ठापना आणि अखंड ज्योत
७ फेब्रुवारी २००० रोजी आई मातेची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून परमभक्त जोरसिंहजी परमार (विठोडा दिवाण) उपस्थित होते. प्रतिष्ठापना सोहळ्यात हजारो भक्तांनी भाग घेतला होता. या वेळी भजन, कीर्तन, प्रवचन यांसारखे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. राजस्थानातील नारलाई येथील कुलदैवत श्री आई माता मंदिरात तेवत असलेली अखंड ज्योत धार्मिक विधी करून कासारवाडी मंदिरात आणली गेली. ज्योतीला आणण्यासाठी ५० हून अधिक भक्तांनी ११०० किलोमीटर अंतर पायी पार केले. आजही ही ज्योत मंदिरात अखंडपणे तेवत असून, भाविक त्याच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात येतात.

वार्षिक उत्सव आणि श्रद्धा
दरवर्षी माघ महिन्यात देवीचा वार्षिक उत्सव साजरा केला जातो. याचबरोबर इतर धार्मिक कार्यक्रम आणि समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील होतो. या मंदिरात असलेल्या अखंड ज्योतीला भाविक विशेष श्रद्धेने पाहतात. या ज्योतीचे दर्शन घेतल्याने दुःख दूर होते आणि व्यवसायात भरभराट होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. आज कासारवाडीतील श्री आई माता मंदिर पिंपरी-चिंचवड परिसरातील सीरवी क्षत्रिय समाजाचेच नव्हे तर इतर समाजांचेही श्रद्धास्थान बनले आहे.
(शब्दांकन ः विजय गायकवाड)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG: भुवनेश्वर-रसिकची जोडी भारी! लखनौचा फलंदाजी क्रम पूर्णपणे ढासळला, आरसीबीला किती धावांचं आव्हान?

IAS Officers Transfers: महाराष्ट्रात पुन्हा मोठी प्रशासकीय उलथापालथ! ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांनी खळबळ, कोण कुठे गेलं?

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Update: राज्यासह देशात आज कुठे काय घडलं? जाणून घ्या....

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

SCROLL FOR NEXT